हॉटेल-रेस्टॉरंट्समध्ये सेवा शुल्काच्या नावाखाली लूट, केंद्र सरकारचा कारवाईचा इशारा

145

हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर ग्राहकांची सेवा शुल्क(SERVICE tAX)च्या नावाखाली लुटमार होत असल्याचे समोर आले आहे. पण आता अशा हॉटेल्स आणि रेस्टॉरंटना केंद्र सरकारने कारवाईचा इशारा दिला आहे. कुठलेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट कोणत्याही ग्राहकाकडून जबरदस्तीने सेवा शुल्क आकारू शकत नसल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

2 जून रोजी होणार बैठक

हॉटेल्समध्ये ग्राहकांकडून जबरदस्तीने सेवा शुल्क वसूल केले जात असल्याच्या तक्रारी या ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावर वाढल्याचे दिसून आले आहे. याची गांभीर्याने दखल घेत केंद्र सरकारने हॉटेल मालकांना कारवाईचा इशारा दिला आहे. याचबाबतीत रेस्टॉरंट मालकांची 2 जून रोजी एक बैठक बोलावण्यात आली असून, यात नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ग्राहक व्यवहार विभागा(DOCA)कडून ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात सेवा शुल्काबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः मुंबईला परतणाऱ्या कोकणवासियांसाठी खुशखबर! परशुराम घाट खुला)

फसवणूक करणा-यांवर होणार कारवाई

रेस्टॉरंटकडून बिलाच्या रक्कमेत ग्राहकांची दिशाभूल करण्यात येत आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने म्हटल्यानुसार, अशा शुल्काच्या कायदेशीरपणाबद्दल 2 जून रोजी होणा-या बैठकीत चर्चा होणार आहे. सेवा शुल्क भरणे हे ग्राहकासाठी ऐच्छिक आहे. तसेच सेवा शुल्क भरण्यास विरोध करणा-या ग्राहकांना त्रास देणा-यांवर सुद्धा कारवाई करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. स्विगी, झोमॅटो, ओला, उबर यांसारख्या सेवा पुरवठादारांना देखील या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

(हेही वाचाः छत्रपतींच्या वंशजांच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न, संभाजीराजेंसाठी मनसेचा शिवसेनेवर हल्ला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.