मुंबई उपनगरातील चेंबूर (Chembur) परिसरात एका चाळीतील दुमजली घराला लागलेल्या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. रविवार, ६ ऑक्टोबर रोजी पहाटे सिद्धार्थनगर परिसरात ही दुर्घटना घडली. या घरातील कुटुंबियांना वेळीच आग लागल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे एकाच कुटुंबातील ७ जणांचा झोपेत असताना होरपळून मृत्यू झाला. यामध्ये ७ वर्षांच्या एका मुलीचाही समावेश आहे. या सगळ्यांना अग्निशमन दलाने घरातून बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
(हेही वाचा – Israel ने मागितली भारताची माफी, चूकही सुधारली; काय आहे कारण ?)
मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे लागली आग ?
घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर ही आग घरात पसरत गेली. पारिस गुप्ता (वय ७), मंजू प्रेम गुप्ता (वय ३०), अनिता प्रेम गुप्ता (वय ३९), प्रेम गुप्ता (वय ३०), नरेंद्र गुप्ता (वय १०) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
पहाटे पाचच्या सुमारास ही आग लागली. आग लागली तो सिद्धार्थ कॉलनीचा परिसर हा गायकवड मार्गाजवळ आहे. हा झोपडपट्टीचा परिसर आहे. गुप्ता कुटुंबाची वन प्लस वन झोपडी होती. एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Chembur)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community