इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक येथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर २.३० वाजेच्या सुमाराला ही घटना घडली. यात सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
घरास आग लागल्याचे समजताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. सरपंच कैलास कडू यांनी तातडीने घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दत्तू खतेले, गांगुर्डे यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी हजर मदतकार्य करण्याबाबत सूचना दिल्या. इगतपुरी नगरपरिषद अग्निशामक दलाचे कर्मचारी नागेश जाधव आदी कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याला सहाय्य केले.
सिलेंडरचा स्फोट झाल्याने आजूबाजूच्या घरांना हादरा बसला. एक दोन घरांनाही यामुळे आग लागली. नथू गिळदे यांच्या घरावर आगीचे गोळे पडले होते. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले घर काशिनाथ त्र्यंबक कोकाटे यांचे असून ते कालच परगावी गेलेले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सरपंच कैलास कडू, दत्तू कोकाटे, काळू दिवटे, भोरु दिवटे, कारभारी गिलांडे, सोमनाथ सारुक्ते, निवृत्ती गिळंदे, पांडुरंग गिळंदे, मिलिंद शिंदे, संदीप शिंदे, भरत गिळंदे, शिवाजी शिंदे, गौरव मुकणे, कारभारी कोकाटे, मुक्तीराम कोकाटे, नथु गिळंदे, वाळू रोंगटे, एकनाथ गिळंदे आदी ग्रामस्थांनी मदतकार्य केले.
(हेही वाचा – बळीराजा संकटात! विदर्भ- मराठवाड्यासह राज्यभरात जोरदार पाऊस, या जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा)
Join Our WhatsApp Community