पाच वर्षांत घरगुती विजेचे दर घटणार; BJP सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा

विश्वास पाठक यांची माहिती, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाचा प्रभाव

69
पाच वर्षांत घरगुती विजेचे दर घटणार; BJP सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा
  • प्रतिनिधी

भाजपा (BJP) सरकारच्या धडाकेबाज सौर ऊर्जा धोरणांमुळे महाराष्ट्रातील घरगुती विजेचे दर भविष्यात घटणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.०” योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा तर होणारच, पण घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांसाठीही ही योजना क्रांतिकारी ठरणार असल्याचे महावितरणचे स्वतंत्र संचालक आणि प्रदेश भाजपाचे सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी स्पष्ट केले.

घरगुती विजेचे दर कमी करण्याचा प्रस्ताव :

महावितरणने घरगुती विजेच्या दरांत मोठी घट करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगासमोर ठेवला आहे. प्रस्तावानुसार, १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दर ५.८७ रुपये प्रति युनिट, तर १०१ ते ३०० युनिट वापर करणाऱ्यांसाठी दर ११.८२ रुपये प्रति युनिटपर्यंत कमी केले जाणार आहेत. सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून भाजपा (BJP) सरकारने विजेच्या दरात घट करण्याचे आश्वासन पूर्ण करण्याचा निर्णायक पाऊल उचलले आहे.

(हेही वाचा – Fact Check: भारतीय नागरिकाला जपानमध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंगासाठी अटक? काय आहे ‘त्या’ छायाचित्रामागचे पाकिस्तान कनेक्शन)

सौर ऊर्जा निर्मितीमुळे विकासाला गती :

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेद्वारे राज्यात आगामी दोन वर्षांत १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे. यामुळे वीज उत्पादनाच्या खर्चात घट होईल, महावितरणचा सरासरी वीज खरेदी खर्च २३ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत कमी होईल, असे पाठक यांनी सांगितले.

औद्योगिक ग्राहकांसाठीही फायदे :

औद्योगिक ग्राहकांना भाजपा (BJP) सरकारने दिलेल्या सर्व प्रोत्साहन योजना आणि सवलती कायम ठेवण्यात येणार असल्याचेही पाठक यांनी नमूद केले. क्रॉस सबसिडीच्या गरजेमध्ये घट होईल, ज्यामुळे औद्योगिक क्षेत्राला दिलासा मिळेल आणि राज्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल.

(हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा; DCM Ajit Pawar यांच्या कार्यकर्त्यांना सूचना)

भाजपा सरकारची वचनपूर्ती :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा (BJP) सरकारने सौर ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून महाराष्ट्राला आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विश्वास पाठक यांनी दिलेली माहिती ही भाजपाच्या वचनपूर्तीची पावती आहे.

विरोधकांच्या टीकेला उत्तर :

विरोधकांनी भाजपाच्या (BJP) सौर ऊर्जा धोरणांवर नेहमीच टीका केली आहे. मात्र, या घोषणांनी त्यांना चोख उत्तर दिले आहे. भाजपा सरकार शेतकरी, घरगुती ग्राहक आणि औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करत असल्याचा विश्वास पाठक यांनी व्यक्त केला.

भाजपाच्या (BJP) नेतृत्वाखाली महाराष्ट्र सौर ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर येईल आणि विजेचे दर कमी करून ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, हे निश्चित आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.