घरगुती वापराची वीज महागणार?

थकबाकीच्या आर्थिक संकटावर मात करण्याचा एक उपाय म्हणून घरगुती व औद्योगिक वापराच्या विजेचे दर महाविकरणकडून पुढील महिन्यात वाढवले जाण्याची शक्यता आहे. थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डळमळीत झाल्याने हा पर्याय निवडला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शेतक-यांकडील कृषी पंपांचे वीज कनेक्शन कापण्यास उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. चालू बिल भरल्यास कनेक्शन कायम ठेवले जाणार आहे. या निर्णयाचा लाखो शेतक-यांना फायदा होणार आहे.

( हेही वाचा: UGC: आता तीन नाही, 4 वर्षांत मिळणार पदवी; जाणून घ्या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून? )

वीजबिल न भरल्याने कृषी पंपांचे कनेक्शन कापण्याची मोहिम महावितरणने हाती घेतली. ती थांबवावी अशी शेतकरी व लोकप्रतिनिधींची मागणी होती. राज्याच्या अनेक भागात लाखो शेतक-यांचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झालेले असताना बिलाची सक्तीने वसुली करणे अन्यायकारक ठरेल, हे लक्षात घेऊन चालू वीजबिल भरल्यास कनेक्शन कायम ठेवण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला आहे.

लेखी आदेश दोन दिवसांत

फडणवीस यांच्या घोषणेनंतर महावितरण एकदोन दिवसांत स्थगितीचा लेखी आदेश काढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांनाच दिलासा देण्यात आला आहे की संपूर्ण राज्यातील शेतक-यांना हे त्यातून स्पष्ट होणार आहे.

चिंता खर्च भागवण्याची

  • महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृषी संजीवनी योजना आणली गेली होती.
  • वीजबिल भरणा-या शेतक-यांना त्यावरील थकबाकीवरील व्याज व विलंबित शुल्क माफ करण्याचा निर्णय झाला होता.
  • महावितरणचा डोलारा सांभाळण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसाहाय्य द्यावे अशी मागणी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here