मुंबईतील चेंबूर, विक्रोळी परिसरात मोठ्या दुर्घटना! घरे कोसळून अनेकांचा मृत्यू

मुंबई महापालिका आणि NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.

123

शनिवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले. शहर व उपनगरात अनेक ठिकाणी पाणी साचले असून, दोन मोठ्या दुर्घटनाही पावसामुळे घडल्या आहेत. चेंबूर वाशी नाका परिसरात भिंत कोसळली असून, विक्रोळी पश्चिमेकडील सूर्या नगर परिसरात घरांवर दरड कोसळून मोठा अपघात झाला आहे. यात काही जणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

वाशी नाका परिसरात कोसळली भिंत

चेंबूर वाशी नाका परिसरातील न्यू भारत नगर येथे घरांवर संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. 18 जुलै रोजी रात्री एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. यात आतापर्यंत तब्बल 17 जण मृत्युमुखी पडले असून, 19 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झाड कोसळून ही भिंत घरांवर कोसळल्याची माहिती मिळत आहे. यात काही जण अजूनही ढिगा-याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यात येत आहे.

दरड कोसळून दुर्घटना

18 जुलै रोजी मध्यरात्री 2 वाजून 40 मिनिटांनी विक्रोळीतील सूर्या नगर येथील लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर असणा-या पंचशील चाळीतील काही घरांवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 3 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई महापालिका आणि NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.