Houses in Mumbai : मुंबईत घर खरेदी करणं झालं महाग, घरांच्या किमतीत १८ टक्क्यांची वाढ झाल्याचा अंदाज

Houses in Mumbai : बांधकाम साहित्याच्या किमतीत झालेली वाढ यासाठी कारणीभूत असल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. 

41
Houses in Mumbai : मुंबईत घर खरेदी करणं झालं महाग, घरांच्या किमतीत १८ टक्क्यांची वाढ झाल्याचा अंदाज
  • ऋजुता लुकतुके

मुंबई शहरातील घरांच्या किमतीत २०२४ मध्ये १८ टक्क्यांची वाढ झाल्याचा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. बांधकाम साहित्य, मजुरी यात झालेली वाढ तसंच शहरातील घरांची वाढती मागणी यामुळे ही वाढ झाल्याचं प्रॉपटायगर डॉट कॉम या वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षमातून समोर आलं आहे. घरांची किंमत वाढत असली तर तरुण वर्गाचं घर खरेदीचं आकर्षण कमी झालेलं नाही. त्यामुळे मागणी वाढून किंमतीतली वाढही सुरूच असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. मुंबई शहराभोवती असलेलं वलय अजूनही कमी झालेलं नाही. मोठमोठे व्यावसायिक, बॉलिवूड स्टार आणि क्रिकेटपटू राहत असल्यामुळे तरुणांचं स्वप्न मुंबईकडे धाव घेण्याचं आहे, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. (Houses in Mumbai)

प्रॉपटायगरच्या अहवालानुसार देशातील प्रमुख ८ शहरांतील ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत विविध शहरांतील मालमत्तेच्या किंमती वेगवेगळ्या प्रमाणात वाढल्या आहेत. हैदराबाद या दक्षिण भारतीय निवासी बाजारपेठेत जवळजवळ मागील दशकभर किंमती जबरदस्त वाढत होत्या. ही वाढ आता मंदावली आहे, पण विश्लेषणासाठी विचारात घेतलेल्या इतर सर्व शहरांत वार्षिक वाढ दुहेरी अंकात झाल्याचे दिसून येत आहे. (Houses in Mumbai)

(हेही वाचा – BMC Budget 2025-26 : महापालिका शाळांमध्ये स्टेम रोबोटीक्स प्रयोगशाळा)

मालमत्तेच्या किंमतीत सर्वाधिक वाढ दिल्ली एनसीआरमध्ये झाली असून या पाठोपाठ मुंबई, पुणे, चेन्नईचा क्रमांक लागतो. देशातील इतर आठ शहरांतील मालमत्तेच्या किंमतीची आकडेवारी पाहिल्यास दिल्ली-एनसीआर (गुरुग्राम, नोयडा, ग्रेटर नोयडा, गाझियाबाद आणि फरीदाबाद) मध्ये ४९%, मुंबई महानगर प्रदेश (मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे) मध्ये १८%, पुणे आणि चेन्नई १६%, बंगळुरू १२, कोलकाता आणि अहमदाबाद १०% तर हैदराबादमध्ये सर्वाधिक कमी म्हणजेच ३% वाढ झाल्याचे दिसून येते. (Houses in Mumbai)

आगामी कालावधीत कर्जाचे हफ्ते स्वस्त झाले आणि सरकारी धोरणं लवचिक झाली तर घर खरेदीला नव्याने प्रोत्साहन मिळू शकतं, असंही या अहवालात म्हटलं आहे. अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १२ लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त केलं आहे. आता रेपोदरही कमी झाले तर दिवाळीच्या सुमारात देशभरात घर खरेदीचा उत्साह वाढू शकतो. (Houses in Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.