DJ वर सरसकट कशी काय बंदी घालू शकता? पोलिसांच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

135

डीजे व कर्णकर्कश वाद्यांवर सरसकट बंदी कशी घालू शकता? ध्वनिप्रदूषण नियमांच्या पलीकडे जाऊन ही बंदी घालणे किती योग्य? अशी विचारणा करुन पोलिसांच्या निर्णयाबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी प्रश्न उपस्थित केले. त्याबाबत 2 ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

उत्सवांना आता सुरुवात होणार असल्याने, डीजे व कर्णकर्कश वाद्यांवर पोलिसांनी घातलेली बंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रोफेशनल ऑडिओ अॅण्ड लाइटनिंग असोसिएशनने अॅड. माधवी अय्यपन यांच्यामार्फत पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. यामध्ये असोसिएशनने बंदीच्या निर्णयाच्या वैधतेला आव्हान दिले आहे.

( हेही वाचा: डिजिटल कंपनीच्या डायरेक्टरला सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी )

याचिकाकर्त्यांचा दावा काय?

डीजे व त्यासारखी कर्णकर्कश आवाज करणा-या वाद्यांच्या नियमनासाठी उपाययोजना करण्याचे आदेश सर्वोच्च व उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र डीजेच्या आवाजाची पातळी धडकी भरवणारी आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे, सांगून गणपती विसर्जन मिरवणुका व अन्य उत्सवांत त्यावर पूर्णपणे बंदी घातल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.