ड्रीम मॉलला अग्नि सुरक्षेचे प्रमाणपत्र दिलेच कसे? पोलिसांचा तपास सुरु 

भांडुप येथील ड्रीम मॉलला २५ मार्च रोजी आग लागली होती. या आगीमुळे याच मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील सनराईज या कोविड हॉस्पिटलमधील ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

ड्रीम मॉलची अग्नि सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असल्याचे बोगस प्रमाणपत्र अग्निशमन दलाला देऊन एनओसी मिळवणाऱ्या कंपनीच्या मालकाला आणि प्रिव्हिलेज हेल्थकेअर कंपनीच्या सीईओ या दोघांना भांडुप पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मात्र एनओसी देण्यापूर्वी येथील अग्नि सुरक्षा यंत्रणेच्या तपासण्याची जबाबदारी अग्निशमन दलाची नव्हती का ? असा सवाल समोर येत आहे. बोगस प्रमाणपत्र देणारी कंपनी ज्या प्रकारे या दुर्घटनेला कारणीभूत आहे, तेवढीच कारणीभूत अग्निशमन दल असल्याचा आरोप सर्व समान्यांकडून केला जात आहे. पोलिसही यादृष्टीने तपास करत आहेत.

२५ मार्च रोजी लागली होती आग!

भांडुप येथील ड्रीम मॉलला २५ मार्च रोजी आग लागली होती. या आगीमुळे याच मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील सनराईज या कोविड हॉस्पिटलमधील ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी ड्रीम मॉल आणि सनराईज हॉस्पिटल व्यवस्थापन यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. ड्रीम मॉलची अग्नि सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसताना देखील शासन मान्यताप्राप्त अग्नि सुरक्षा यंत्रणा तापसणारी पोना कॉर्पोरेशनचे कंपनीचे मालक हरेश दह्यालाल जोशी आणि प्रिव्हेलेज हेल्थकेअर कंपनीचे सीईओ जॉर्ज पुथ्थु सेरी यांनी सनराईज हॉस्पिटलच्या फायद्यासाठी ड्रीम मॉलची अग्नि सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित असून कार्यक्षम असल्याचे बोगस प्रमाणपत्र तयार केले होते. हे प्रमाणपत्र अग्निशमन दलाला देऊन ना- हरकत पत्र मिळवण्यात आले होते.

(हेही वाचा : डॉ. गुप्ताच्या विरोधात गुन्हा दाखल! ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीचा परिणाम )

पाहणी न करताच ना- हरकत प्रमाणपत्र!

ड्रीम मॉलला ना – हरकत प्रमाणात देण्यापूर्वी येथील अग्नि सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे का? याची खात्री करण्याची जबाबदारी अग्निशमन दलाची होती, तर अग्निशमन दलाने ड्रीम मॉलची अग्नि सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली होती का? असा सवाल उभा राहत आहे. पाहणी न करताच केवळ शासन मान्यताप्राप्त अग्नि सुरक्षा यंत्रणा तपासणारी पोना कॉर्पोरेशनचे कंपनीच्या प्रमाणपत्राची खात्री न करताच ड्रीम मॉलला ना हरकत पत्र दिले कसे, असा प्रश्न सर्व समान्यांकडून विचारला जात आहे. या दुर्घटनेला अटक करण्यात आलेले जेवढे जबाबदार आहे, तेवढेच जबाबदार अग्निशमन दल असून त्याच्याकडे देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here