भारताच्या आकाशातून उड्डाण करताना नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याचे (Mahakumbh) अत्यंत सुरेख असे छायाचित्र टिपले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) भारतावरून उड्डाण करत असताना अंतराळातून हे छायाचित्र टिपले आहे.
भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक असलेला दर १२ वर्षांनी भरणारा कुंभमेळा (Mahakumbh) हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखला जातो. भारतातील हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या चार शहरांमध्ये दर १२ वर्षांनी आयोजित होणार्या या मेळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. यंदा उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे कुंभमेळ्यामध्ये ४५ कोटी हिंदू येतील, अशी अशा आहे. उद्या मौनी अमावस्या आहे. तोपर्यंतच १३ कोटी २१ लाख भाविकांनी अमृत स्नान केल्याची अधिकृत माहिती आहे.
(हेही वाचा Delhi Assembly Election : माजी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्याच्या मुलांमध्ये प्रतिष्ठेची लढत
अवघ्या जगाला भुरळ पडणाऱ्या या कुंभमेळ्यात पवित्र नद्यांच्या संगमामध्ये स्नान करून पाप धुवून पुण्य संपादन करण्याच्या भावनेने भारतासह जगभरातून लाखो भाविक दररोज प्रयागराजमध्ये येत आहेत. रोज येणाऱ्या भाविकांचा ओघ अखंड सुरू आहे. सोमवार, २७ जानेवारी य दिवशी ४६.६४ लाखाहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले आहे. तर २६ जानेवारीपर्यंत १३.२१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र नद्यांच्या संगमामध्ये श्रद्धेची डुबकी लावत स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे..जगातील सर्वात मोठा मानवी मेळा पृथ्वीपासून ४५० किमी अंतरावर अंतराळातूनही दिसतो. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून या महाकुंभाचे फोटो टिपण्यात आले आहेत. अंतराळवीर डॉन पेटिट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर गंगेच्या संगमाची प्रकाशमय छायाचित्र शेअर केली आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘२०२५ महाकुंभमेळा गंगा नदी काठावरील तीर्थयात्रा रात्रीच्या वेळी आयएसएसवरून, जगातील सर्वात मोठा मानवी मेळा चांगल्या प्रकारे रोषणाईने सजवला गेला आहे.
Join Our WhatsApp Community