पुण्यात (Pune) गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) नावाच्या दुर्मिळ आजाराचे एकूण 73 रुग्ण सापडले आहेत. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे एकूण रूग्णांपैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर 47 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक 44 रुग्ण आहेत. 9 वर्षापर्यंत असलेले 13 रुग्ण तर 60 ते 69 वयोगटातील 15 रुग्णांना याची लागण झाली आहे.
या आजावर अधिक माहिती मिळवण्यासाठी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने अपोलो हॅास्पिटलचे डॅा. अक्षय छल्लाणी (Dr. Akshay Challani) यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना डॅा. अक्षय छल्लाणी म्हणाले, “गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) हा संसर्गजन्य रोग नाही. त्यासंदर्भात काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पाणी उकळून पिल्याने फक्त याच नाही तर अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं. या आजाराची प्राथमिक पहिले लक्षण म्हणजे, अशक्तपणा आणि हातपायांना मुंग्या येणे, बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणे, धाप लागणे/श्वास घेण्यास त्रास होणे ही आहेत. हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.” (Guillain Barre Syndrome)
हेही वाचा- “ट्रम्प २०२० साली हरले नसते तर…” ; Vladimir Putin यांनी ट्रम्प यांचा उल्लेख करत केलं मोठं विधान
“हा आजार होण्याचे विविध कारण आहेत, जसे की बॅक्टेरिअर इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे आदि. गोष्टी याला कारणीभूत ठरण्याची शक्यता असते. यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नसांवर हल्ला करते. यामुळे मज्जातंतूंच्या काही भागांना नुकसान होतं.” (Guillain Barre Syndrome)
आजाराची लक्षणे दिसू लागल्यास काय काळजी घ्यावी ? या प्रश्नावर बोलताना डॅा. अक्षय छल्लाणी म्हणाले, “सध्या या आजाराच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्न खाऊ नये. काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.” (Guillain Barre Syndrome)
गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या आजारावर अद्याप लस उपलब्ध नाही. त्यामुळे पाणी उकळून प्यावं. तसंच, अन्न स्वच्छ आणि ताजं असाव, वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा. असं केल्यासही संसर्ग टाळता येईल. असे डॅा. अक्षय छल्लाणी यांनी सांगितले आहे. (Guillain Barre Syndrome)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community