मुंबईच्या हवेचा दर्जा कसा आहे? KEM रुग्णालयातील तज्ज्ञ करणार अभ्यास

84

गेल्या वर्षाखेरीस मुंबईतील हवेत सातत्याने होणा-या बदलांमुळे मुंबईकरांच्या तब्येत बिघडली. परिणामी, सातत्याने मुंबईत होणा-या हवेतील बदलांचा आणि शहरातील झाडे, त्यांच्यातील अंतर या सर्व घटकांचा अभ्यास तज्ज्ञ आता करणार आहेत. केईएम रुग्णालयातील तज्ज्ञांनी याकरता पुढाकार घेतला असून, पश्चिम द्रुतगती मार्गावरील झाडे आणि हवेचा दर्जा याचा पहिल्या टप्प्यात अभ्यास करण्यात येणार आहे.

एन्व्हार्यनमेंटल पोल्युशन रिसर्च सेंटर आणि केईएममधील तज्ज्ञांनी या प्रकल्पाचा भाग म्हणून नुकताच पश्चिम द्रुतगती मार्गावरील नागरिकांशी संवाद साधला. तसेच, परिसरातील झाडांच्या आजूबाजूला प्रदूषणाची पातळी किती आहे, याचाही अभ्यास केला.

( हेही वाचा: कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन, EPFO कडून मार्गदर्शक सूचना जारी, ‘हे’ आहेत पात्र कर्मचारी )

दोन झाडांमध्ये किती अंतर असावे?

सध्या पालिकेकडून दोन झाडांमध्ये 15 फुटांचे अंतर राखले जाते. दोन झाडांमधील अंतर प्रदूषणाला अटकाव करते का? याबद्दल तज्ज्ञ अभ्यास करणार आहेत. महामार्ग वा मुख्य रस्त्यांवरील निवासी वसाहतींनी झाडे लावल्यास हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, असे डाॅक्टर अमिता आठवले यांनी नमूद केले.

झाडांच्या आजूबाजूला प्रदूषण अधिक?

  • प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील निरीक्षणात परिसरातील वातावरणात 40 टक्के वायू प्रदूषण असल्याचे दिसून आले.
  • महत्त्वाचे म्हणजे झाडांच्या आजूबाजूला प्रदूषणाची पातळी अधिक असल्याचे दिसले. सामान्यत: झाडे अधिक असतात, तेथे प्रदूषण नसल्याचे म्हटले जाते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.