Mahakumbh Mela मध्ये आतापर्यंत किती भाविकांनी केले स्नान? मुख्यमंत्री योगी यांनी मांडलेला अंदाजही चुकला

उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती विभागानुसार, रविवार, १६ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजेपर्यंत १.१८ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमानात पवित्र स्थान केले.

468
MahaKumbh Mela 2025 मध्ये किमान ४५ कोटी भाविक स्नान करतील असा अंदाज उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मांडला होता. मात्र शनिवार, १५ फेब्रुवारीपर्यंत कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या पाहता मुख्यमंत्री योगी यांचा अंदाज चुकला आहे. एकूण ५१.४७ भाविकांनी स्नान केल्याची नोंद झाली आहे.
१३ जानेवारीपासून या महाकुंभ मेळ्याला (Mahakumbh Mela) प्रारंभ झाला. उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती विभागानुसार, रविवार, १६ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजेपर्यंत १.१८ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमानात पवित्र स्थान केले. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती अशा पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा (Mahakumbh Mela) सुरू आहे. १४४ वर्षांनी विशेष असलेल्या या महाकुंभमेळ्याला देश-विदेशातीलअनेक भाविक संगमस्नानासाठी आणि  कल्पवासासाठी प्रयागराजमध्ये दाखल हाेत आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा दर 12 वर्षांनी होतो. याआधीचा कुंभमेळा 2013 मध्ये झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये अर्धकुंभमेळा झाला. तो दर 6 वर्षांनी होतो. आता तब्‍बल १२ वर्षानंतर प्रयागाजरमध्‍ये सुरु असलेल्‍या 45 दिवसांच्या महाकुंभ मेळ्यास (Mahakumbh Mela) त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी लाखो भाविक येत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.