Mumbai Airport वरून नोव्हेंबर महिन्यात किती विमान उड्डाणे झाली? आकडा ऐकून अवाक व्हाल…

73

देशातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक व्यग्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (Mumbai Airport)  सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात २०२४ मधील सर्वाधिक उड्डाणे अनुभवली आहेत. या महिन्यात २७ हजार २०० विमानांची ये-जा झाली असताना २७ नोव्हेंबरला वर्षभरातील सर्वाधिक उड्डाणांची नोंद झाली.

मुंबईच्या या विमानतळावरून (Mumbai Airport) दररोज सरासरी ९००हून अधिक विमानांची ये-जा असते. हा आकडा दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा कमी असला तरीही मुंबईच्या विमानतळावर एकावेळी एकच धावपट्टी वापरात येते. त्यामुळे एकाच धावपट्टीवरून ९००हून अधिक उड्डाणे हाताळणारे मुंबईचे विमानतळ आशियात एकमेव आहे. याच विमानतळाने मागीलवर्षी १५ नोव्हेंबरला १०३२ इतक्या विक्रमी उड्डाणांची २४ तासांत हाताळणी केली होती. यावर्षी २७ नोव्हेंबरला ९४१ इतक्या सर्वाधिक उड्डाणांची नोंद झाली.

(हेही वाचा एआयएमआयचे माजी खासदार Imtiaz Jalil यांच्याविरोधात एफआयआर; तर ‘या’ प्रकरणांमुळे 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल)

नोव्हेंबर या संपूर्ण महिन्यात ४७.७० लाख प्रवाशांनी ये-जा केली. त्यातील ३२ टक्के (१३.७० लाख) प्रवासी आंतरराष्ट्रीय होते. तर, ३४ लाख प्रवासी हे देशांतर्गत होते. या प्रवाशांनी एकूण २७ हजार २०० विमानांसह ये-जा केली असताना त्यातील देशांतर्गत उड्डाणांची संख्या १९ हजार ६९६ व आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या ७ हजार ५०४ होती.

कार्गो हाताळणीत ११ टक्के वाढली 

नोव्हेंबर महिन्यात विमानतळावर (Mumbai Airport) एकूण ७१ हजार ०४६ टन कार्गोची हाताळणी झाली. हा आकडा नोव्हेंबर २०२३च्या तुलनेत ११ टक्के अधिक होता. एकीकडे देशांतर्गत प्रवासीसंख्या आंतरराष्ट्रीयच्या तुलनेत अधिक असताना दुसरीकडे कार्गो सामान मात्र आंतरराष्ट्रीय अधिक होते. एकूण कार्गोपैकी ५२ हजार ३९३ टन आंतरराष्ट्रीय व १८ हजार ६५३ टन देशांतर्गत होते. एकूण ६९९ विमानांद्वारे (३४९ देशांतर्गत व ३५० आंतरराष्ट्रीय) कार्गोची हाताळणी झाली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.