मुंबईत दरवर्षी किती HIV रुग्ण आढळतात? धक्कादायक आकडेवारी आली समोर… 

197
एचआयव्ही (HIV) म्हणजे ह्यूमन इम्युनोडेफिशिएन्सी व्हायरस’ हा आजही समाजासाठी गंभीर आरोग्य समस्या बनलेला आहे. दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन (December 1 is World AIDS Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे एचआयव्ही , एड्स (Aids) विषयी जागरूकता निर्माण करणे आणि या गंभीर आजाराविषयी असलेले गैरसमज लोकांच्या मनातून नाहीसे करणे हा आहे. यारताच यादिवशी एड्स आणि एचआयव्हीशी (HIV) संबंधित आवश्यक गोष्टींबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. (HIV)
गेल्या काही वर्षांपासून सरकारी पातळीवरून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असल्यामुळे रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर नवीन उपचार पद्धती विकसित झाल्यामुळे त्याला रुग्णांचा प्रतिसाद चांगला आहे. मात्र, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण समितीकडून (Mumbai District AIDS Control Committee) करण्यात येणाऱ्या तपासणीत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दरवर्षी सर्वसाधारण तीन हजार एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असून, सध्याच्या घडीला मुंबईत ४० हजार ६५८ एचआयव्ही बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

दरवर्षी तपासणीत एचआयव्ही बाधित नवीन रुग्णांमध्ये ७५ टक्के रुग्ण हे १५ ते ४९ या वयोगटांतील आढळून येतात. त्यामध्ये ३१ टक्के प्रमाण महिलांचे आहे. बहुतांश वेळा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे त्यांना हा संसर्ग झाल्याचे दिसून येते. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून सुद्धा एचआयव्हीचे (HIV) रुग्ण सापडत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. सरकार कडून एचआयव्ही बाधित रुग्णांना मोफत औषधे दिले जातात. तसेच सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्यामुळे भेदभाव करण्याचे प्रमाण कमी झाल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
(हेही वाचा – घटत्या लोकसंख्येबाबत सरसंघचालक Mohan Bhagwat यांचा सल्ला; म्हणाले, नवविवाहितांना…)
पाच वर्षांत रुग्णांमध्ये घट
मुंबईमध्ये २०१९-२० मध्ये ६ लाख ९४ हजार ८२४ नागरिकांच्या एचआयव्ही चाचण्या करण्यात आल्या. त्यातून ४ हजार ६१७ नवे रग्ण सापडले. तर २०२३-२४ मध्ये ७ लाख २९ हजार ३०९ इतक्या नागरिकांच्या एचआयव्ही चाचण्या करण्यात आल्या. त्यातून ३ हजार ३८३ रग्ण सापडले. यावरून मागील पाच वर्षांत मुंबईतील एचआयव्ही बाधित रुग्णांच्या संख्येत ०.२ टक्क्यांनी घट झाली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.