अदानींच्या कंपन्यांचे किती झाले नुकसान? जाणून घ्या

130

हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपला जोरदार फटका बसला आहे. गौतम अदानी यांची श्रीमंतांच्या जागतिक क्रमवारीत बरीच पीछेहाट झाली आहे. अदानी ग्रुपमधील कंपन्यांचा लेखाजोखा अभ्यासल्यावर त्याचा प्रत्यय येतो.

अदानींच्या कंपन्यांचा तिमाही अहवाल जाहीर

अदानी पॉवरने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. तिसऱ्या तिमाहीत अदानी पॉवरच्या निव्वळ नफ्यात ९६ टक्के घट झाली आहे. ही अदानी समूहाची पॉवर आणि एनर्जी कंपनी आहे. डिसेंबर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा वार्षिक ९६ टक्क्यांनी घसरून तो ८.७ कोटी रुपये झाला आहे, असे अदानी पॉवरने सांगितले. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला २१८.५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. अदानी विल्मारचा निकालही जाहीर झाला आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. अदानी समूहाच्या या कंपनीच्या कामकाजातून मिळणारा महसूल ४४.८ टक्क्यांनी वाढून ७,७६४.४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एका वर्षापूर्वी ते ५,३६०.९ कोटी रुपये होते. कंपनीचा एकत्रित ऑपरेटिंग नफा १७ टक्क्यांनी घसरून १,४६९.७ कोटी रुपये झाला. मागील वर्षी याच कालावधीत हे प्रमाण १,७७०.८ कोटी रुपये होते.

(हेही वाचा अदानींना मोठा फटका; फ्रान्सच्या कंपनीने प्रोजेक्ट थांबवला)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.