UPSC Result : महाराष्ट्रातील किती विद्यार्थी झाले उत्तीर्ण?

321

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC Result) परिक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 8.6 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम, देशात त्यांनी 42 वा क्रमांक पटकाविला आहे.

या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. नेहा राजपूत यांनी 51वा तर अनिकेत हिरडे यांनी  81 वा क्रमांक पटकावला आहे. केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली.  जानेवारी – एप्रिल 2024 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. (UPSC Result)

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : निवडणुकीतील आचारसंहिताभंगाच्या 18,722 तक्रारी काढल्या निकाली)

या परिक्षेच्या निकालातील (UPSC Result) उत्तीर्ण 1016 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –347, आर्थिक मागास प्रवर्गातून  (ईडब्ल्यूएस) 115, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – 303, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 165, अनुसूचित जमाती प्रवर्गातून- 86  उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 37  दिव्यांग उमेदवारांचा (16 ऑर्थोपेडिकली अपंग, 06 दृष्टीहीन, 05 श्रवणदोष आणि 10 एकाधिक अपंग) यांचा समावेश आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.