राज्यातील 353 तालुक्यांपैकी 54 तालुक्यांना पाणी टंचाईच्या (water shortage) झळा बसणार आहे, तर 299 तालुक्यांना फारशी झळ बसणार नाही. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली. या अहवालानुसार राज्यात कोणत्याही तालुक्यात अतितीव्र स्वरूपाची पाणी टंचाई नाही. 2 तालुक्यांत तीव्र पाणी टंचाई, 7 तालुक्यांत सौम्य आणि 45 तालुक्यांत अतिसौम्य पाणी टंचाई जाणवणार आहे. तर 299 तालुक्यांत फारशी पाणी टंचाई जाणवणार नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
(हेही वाचा Ayodhya: राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त मुंबईत दिवाळी साजरी करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश)
सप्टेंबर 2023 मध्ये भूजल पातळी खालावली
पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि सातारा जिल्ह्यातील खांडला तालुक्यात तीव्र पाणी टंचाई (water shortage) जाणवणार असल्याचे ऑक्टोबरच्या अहवालात म्हटले आहे. अंबाजोगाई, परभणी, बारामती, इंदापूर, कडेगाव, खानापूर व शिराळा तालुक्यांत सौम्य पाणी टंचाई जाणवणार आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा वर्षातून चार वेळा सर्वेक्षण करते. राज्यात स्थिर भूजल पातळीच्या नोंदी घेण्यासाठी 3,920 निरीक्षण विहिरी पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केल्या आहे. निरीक्षण विहिरीतील स्थिर भूजल पातळीच्या नोंदी दरवर्षी सप्टेंबर, जानेवारी, मार्च व मे महिन्यात घेण्यात येतात. सप्टेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या नोंदीतच भूजल पातळी खालावल्याचे आढळून आले होते.
Join Our WhatsApp Community