मुंबईत दसऱ्याच्या मुहूर्तावर किती वाहनांची विक्री? RTO ची आकडेवारी आली समोर

232
मुंबईत दसऱ्याच्या मुहूर्तावर किती वाहनांची विक्री? RTO ची आकडेवारी आली समोर
मुंबईत दसऱ्याच्या मुहूर्तावर किती वाहनांची विक्री? RTO ची आकडेवारी आली समोर

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी गाड्यांच्या शोरूममधून सुमारे ५० ते ६० एसयूव्ही कार आणि १०० च्यावर अॅडव्हेंचर बाईक खरेदी केल्याची माहिती परिवहन विभागांकडून मिळाली आहे. सध्या तरुणाईमध्ये बाइक राइड आणि डोंगर भागांमध्ये प्रवास करण्याच्या वाढत्या ट्रेंडमुळे एसयूव्ही कार, क्रूझर आणि अॅडव्हेंचर बाइकची मागणी वाढत आहे. त्याच बरोबर इलेक्ट्रिक वाहनाच्या (Electric vehicle) खरेदीत सुद्धा वाढ होत आहे. तसेच दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर वाहन खरेदीला नेहमीच मोठी पसंती देतात. (RTO)

काहींनी शोरूममध्ये आपल्या आवडीच्या वाहनांचे बुकिंग करून ठेवले आहे. तसेच वाहन नोंदणी वेळेत व्हावी, याकरिता मुंबई आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी गतीने काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

नवीन वाहनांची नोंदणी किती ?

यंदा दसर्‍याच्या (Dussehra 2024) मुहूर्तावर मुंबई सेंट्रल आरटीओ विभागात १,५२१ दुचाकी तर ६८७ चारचाकी वाहणांची नोंद झाली आहे. तर मुंबई पूर्व आरटीओ विभागात १,२७६ दुचाकी तर ३६५ चारचाकी वाहनांची नोंद झाली आहे. संबंधित वाहनांची नोंद ही ऑक्टोबर महिन्यामधली आहे.   (RTO)

(हेही वाचा – Baba Siddique Shot Dead: Zeeshan Siddiqui यांच्या घराबाहेर आरसीपी दल दाखल; बंदोबस्तात वाढ)

दमदार परफॉर्मन्स

ग्राहकांनी विशेषतः कॉम्पॅक्ट एसयूव्ही (Compact SUV) कारला पसंती दिली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. उच्च दर्जाच्या, स्टायलिश आणि दमदार परफॉर्मन्सच्या गाड्यांची मागणी बाजारात वाढत चालली आहे. लोकांच्या जीवनशैलीत बदल होऊन, अधिक सुरक्षित, प्रीमियम गाड्यांचा वापर करण्याकडे कल वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.