राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करून सर्व कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची भेट दिली आहे. आता महागाई भत्ता २८ टक्क्यांवरून ३१ टक्के करण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि केंद्रातील सरकारी कर्मचारी या दोघांना २०२२ पासून नव्या महागाई भत्त्याप्रमाणे वेतन मिळणार आहे.
( हेही वाचा : महागाई भत्ता तर मिळाला; राज्य सरकारी कर्मचारी म्हणतात जुन्या पेन्शनचे काय? )
( हेही वाचा : पगार वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची भेट )
राज्यात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे पैसे देण्याचा निर्णय १ वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात आला नव्हता. १ जुलै, २०२१ ते ३० सप्टेंबर, २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील ११ % महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम मार्च, २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांना एवढी मिळणार थकबाकी
कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या ३ महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम मार्च महिन्याच्या पगारासोबत मिळणार आहे. अ, ब, क आणि ड वर्गातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना मिळणारी रक्कम खालीलप्रमाणे.
- ⇒» अ गट वर्ग – ४९ हजार ८१८
- ⇒» ब गट वर्ग – ३५ हजार ४५४
- ⇒» क गट वर्ग – १८ हजार ७५३
- ⇒» ड गट वर्ग – १२ हजार ०८४