आतापर्यंत ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे किती ऑक्सिजनची वाहतूक झाली? वाचा… 

पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस कर्नाटकात आली होती. त्यावेळी १२० मे.टन ऑक्सिजन बंगळुरू येथे पोहचवण्यात आला होता.

सध्या देशात कोरोनाच्या माध्यमातून सुरु असलेली आरोग्याची आणीबाणी पाहता भारतीय रेल्वेने मदतीचा प्रवास जो सुरु केला आहे, तो सुरूच ठेवला आहे. सध्या विविध राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांमध्ये केली. आतापर्यंत रेल्वेने सुमारे ४,७०० मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक केली आहे. त्यामाध्यमातून सुमारे २९५ टँकर्स विविध राज्यात पोहचवण्यात आले आहेत.

एका दिवसात ८३१ मे.टन ऑक्सिजनची वाहतूक केली!

रविवारी, १० मे रोजी आतापर्यंतचा एका दिवसातच ८३१ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक केली आहे. एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची वाहतूक केली आहे. आजवर ७५ ऑक्सिजन एक्स्प्रेसने ऑक्सिजनचे वितरण केले आहे. यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात २९३ मे.टन लिक्विड ऑक्सिजन पोहचवला. तर १,३३४ मे.टन लिक्विड ऑक्सिजन उत्तर प्रदेशात, मध्यप्रदेशात ३०६ मॅट्रिक टन, हरियाणामध्ये ५९८ मे.टन. तेलंगणा येथे १२३ मे.टन, राजस्थानात ४० मे.टन आणि दिल्लीत २,०११ मे. टन लिक्विड ऑक्सिजनचे वितरण केले.

(हेही वाचा : कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी टास्क फोर्स!)

पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस कर्नाटकात गेली!

पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस कर्नाटकात आली होती. तो ऑक्सिजन झारखंड येथील टाटानगर येथून आला होता. त्यावेळी १२० मे. टन ऑक्सिजन बंगळुरू येथे पोहचवण्यात आला होता. अजूनही आणखी लिक्विड ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहेत. सध्याच्या कोरोना स्थितीत शेतकरीही त्यांच्याकडील कृषी मालाची वाहतूक किसान रेलच्या माध्यमातून करत आहेत. महाराष्ट्रातून २४६ टन कांदा प. बंगाल आणि मालदा येथे पोहचवला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here