मध्य रेल्वे मेगाब्लॉकच्या काळात Best Bus ने कमावले एवढे रुपये? जाणून घ्या…

255
BEST : बेस्ट उपक्रमाची सुरक्षा अनामतच्या नावाखाली लूट, वीज ग्राहकांना पाठवल्या नोटिसा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) स्थानक आणि ठाणे येथे प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी शुक्रवार मध्यरात्रीपासून शनिवार व रविवार दुपारपर्यंत तीन दिवस जम्बो मेगाब्लॉक (Jumbo Megablock) घेण्यात आला होता. रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे स्थानक येथे तर सीएसएमटी रेल्वे स्थानक येथे ३६ तासांचा जम्बो ब्लॉक घेतला होता. या तीन दिवसाच्या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावर ९३० लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नोकरी, काम धंद्यासाठी नियमित प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते. (Best Bus)

मध्य रेल्वेने घेतलेल्या या ब्लॉकची स्थिती लक्षात घेवून बेस्ट रेल्वे प्रवाशांच्या मदतीला नेहमीप्रमाणे धावून आली. मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकचा फायदा बेस्टला झाला. ३१ मे आणि १ जून या दोन दिवसांत बेस्टमधून जवळपास ५५ लाख मुंबईकरांनी प्रवास केला. त्यातून बेस्ट (Best Bus) उपक्रमाला जवळपास कोटीमध्ये अधिक उत्पन्न मिळाले आहे. 

(हेही वाचा – Madhya Pradesh Accident: ट्रॅक्टर उलटून १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; राष्ट्रपतींनी ‘X’ वर पोस्ट लिहून व्यक्त केलं दु:ख)

लोकलच्या कोंडीमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त बसगाड्या चालविण्यात आल्या. ३१ मे रात्री १२:३० पासून २ जून दुपारी १२:३० पर्यंत नियमित बस फेऱ्यांव्यतिरिक्त या अतिरिक्त सेवा देण्यात आल्या होत्या. या मध्ये ३१ मे ते २ जून पर्यंत अंदाजे ५५ लाख ९८ हजार ६७ प्रवाशांनी प्रवास केला असून, बेस्ट (Best Bus) बसला ५ कोटींचा गल्ला जमा झाला.  

(हेही वाचा – Amul Milk: अमूल दूध महागलं, लिटरमागे किती रुपयांची झाली वाढ? जाणून घ्या…)

बेस्ट ने (Best Bus) यामध्ये साध्या, एसी, दुमजली बसगाड्यांचा समावेश केला होता. त्यामुळे सीएसएमटी ते दादर, भायखळा, वडाळा आदी ठिकाणी ये-जा करणे रेल्वे प्रवाशांसाठी प्रवास करणे सुलभ झाले होते. मेगाब्लॉक दरम्यान १ जून रोजी बेस्टकडून ३४९ अतिरिक्त फेऱ्या तर २ जून रोजी २२७ अतिरिक्त फेरीचे नियोजन करण्यात आले होते. (Best Bus)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.