मुंबई महापालिकेची सर्वांत मोठी कचरा भराव भूमी असलेल्या देवनार (Deonar) डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपत आली असून या भराव भूमीवरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. परंतु याठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे याठिकाणी रात्रीची प्रकाश व्यवस्था राखण्यासाठी मोबाईल हायमास्टची सुविधा भाडेतत्वावर पुरवण्यात येत आहे. तब्बल दहा ते बारा वर्षांपासून याठिकाणी भाडेतत्वावर मोबाईल हायमास्टची सुविधा भाडेतत्वावर घेण्यात येत असून जवढे पैसे भाडेतत्वावरील हायमास्टच्या खर्चावर घातले त्यापेक्षा कमी पैशात महापालिकेची स्वत:च्या मालकीचे हायमास्ट असते, असे स्पष्ट दिसून येत आहे.
देवनार (Deonar) कचरा भूमी ही मुंबई महानगरपालिकेची सर्वात मोठे डम्पिंग ग्राऊंड असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे १२० हेक्टर एवढे आहे. महापालिकेच्या विविध विभागातून व कचरा स्थानांतरण केंद्रातून सध्या दररोज अंदाजे ८००-९०० मेट्रीक टन एवढ्या कचऱ्याची याठिकाणी डम्पिंग ग्राऊंड कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. सध्या देवनार कचरा भूमीत स्वीकारण्यात येणाऱ्या कचरा व कव्हरिंग मटेरियलची विल्हेवाट लावण्यात येत आहे.
(हेही वाचा Muslim : मौलानाकडून विवाहितेवर ११ वर्षे अत्याचार; व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांनी चोपले)
सध्या या डम्पिंग ग्राऊंडमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार विविध ठिकाणी लूप बनवून क्षेपणभूमीत येणाऱ्या कच-याची विल्हेवाट लावण्यात येत असल्यामुळे प्रकाश व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी हलवावी लागते. त्यामुळे कृत्रिम प्रकाशाची निकड भागविण्याकरीता मोबाईल हायमास्ट सेवा उपयुक्त ठरते. दिवस पाळीमध्ये कचरा घेण्यासाठी रात्र पाळीमधेच लूप तयार करून ठेवले जातात आणि कृत्रिम प्रकाशाच्या व्यवस्थेमुळे रात्रीच्या वेळी कमी वेळेत जास्तीत जास्त कच-याचे स्थानांतर करुन क्षेपणभूमीची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या मिथेन गैसमुळे लागणाऱ्या आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी रात्रपाळीमध्ये काम करावे लागते आणि त्यासाठी कृत्रिम प्रकाश व्यवस्थेची गरज भासते. देवनार कचरा भूमीच्या १२०हेक्टर क्षेत्रातील वाढता कचरा, कमी होत जाणारी जागा, सतत बदलणारे लूप, खाली-वर होत जाणारा कचरा या सर्वबाबींचा सखोल विचार करता याठिकाणी सायंकाळी ०६ ते सकाळी ०६ या कालावधीमध्ये कृत्रिम प्रकाशाची व्यवस्था करण्यासाठी याठिकाणी मोबाईल हायमास्टद्वारे पुरवली जाते.
यासाठी पूर्वी नेमलेल्या कंपनीची मुदत संपुष्टात आल्याने नवीन कंपनीची निवड करण्यात येत आहे. याठिकाणी प्रतिदिन ०८ हायमास्टची सुविधा ही प्रति पाळी २८५६ रुपये दराने उपलब्ध करून घेतली जात आहे.त्यामुळे वर्षाला ८६ लाख ७४ हजार रुपये एवढा खर्च या हायमास्टच्या सेवांवर खर्च केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मागील कंत्राट हे ६ सप्टेंबर २०२३ रोजी संपुष्टात आले आहे. त्यामध्ये प्रति पाळी २९७१ रुपये मोजले जात होते. त्यामुळे नव्याने नियुक्त कंपनीचा दर प्रति पाळी १४० रुपयांनी कमी आहे. यासाठी जय मल्हार हायरिंग सर्विसेस कंपनीची निवड करण्यात आली आहे.
मागील दहा वर्षांपासून हायमास्टची सुविधा पुरवली जात असून ही सुविधा भाडेतत्वावर घेतली जात असल्याने यासाठी यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असल्याने हा खर्च आजवर ७ ते ८ कोटींच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे एवढ्याच खर्चात महापालिकेला स्वत:च्या मालकीचे हायमास्ट खरेदी करून त्याची सुविधा उपलब्ध करून देता आली असती. त्यातच नवीन यंत्रणा असल्याने हमी कालावधी पूर्ण झाल्यानंतर याच्या देखभालीचा खर्च हा कमी असल्याने महापालिकेचे दरवर्षी लाखो रुपये वाचले गेले असते. परंतु याठिकाणी आधीच बुलडोझर आणि जेसीबीची यंत्रणा भाडेतत्वावर घेऊन तिजोरीतील रक्कम खर्च करताना आता या मोबाईल हायमास्टवर भाडेतत्वावर खर्च केला जात आहे.
Join Our WhatsApp Community