नोकरीला 5 वर्ष पूर्ण झाली नाही तरी मिळू शकतो ग्रॅच्युइटीचा लाभ, काय सांगतो कायदा?

खाजगी कंपन्यांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांना ग्रॅच्युइटीबाबत अनेक प्रश्न असतात. आता केंद्र सरकारकडून नव्या कामगार कायद्यांमध्ये ग्रॅच्युइटीबाबत मोठे निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी ग्रॅच्युइटी नेमकी कशा पद्धतीने काढली जाते आणि तिचा फायदा काय याबाबत माहिती करुन घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

काय आहे ग्रॅच्युइटीचा नियम?

कंपनीसाठी वर्षानुवर्ष सलग काम करणा-या कर्मचा-यांना कंपनीकडून एक आभार राशी म्हणून ग्रॅच्युइटी देण्यात येते. देशातील सर्व कारखाने,खाणी,ऑइल फिल्ड,बंदरे आणि रेल्वे सारख्या सरकारी संस्थांमध्ये ग्रॅच्युइटी अॅक्ट लागू आहे. तसेच ज्या संस्थेत 10 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत अशा सर्व कंपन्या किंवा दुकानांना आपल्या कर्मचा-यांना ग्रॅच्युइटी देणे बंधनकारक आहे.

(हेही वाचाः Airtel ग्राहकांना मोठा धक्का, कंपनीने 57 टक्क्यांनी वाढवले रिचार्जचे दर)

5 वर्षांपेक्षा कमी काम करणा-यांना मिळते ग्रॅच्युइटी?

कोणत्याही कंपनीमध्ये सलगरित्या किमान 5 वर्ष काम करणा-या कर्मचा-यांना कंपनीकडून ग्रॅच्युइटी देण्यात येते. पण काही वेळा 5 वर्षांची कामाची अट पूर्ण न करणा-या कर्मचा-यांनाही ग्रॅच्युइटीचा लाभ मिळू शकतो. ग्रॅच्युइटी कायद्याच्या सेक्शन-2ए मध्ये याबाबतची तरतूद करण्यात आली आहे.

काय सांगतो कायदा?

ग्रॅच्युइटी कायद्याच्या सेक्शन-2ए प्रमाणे भूमिगत खाणींमध्ये काम करणा-या कोणत्याही कर्मचा-याने सलग 4 वर्ष 190 दिवस काम केले असेल तर ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी त्या कर्मचा-याला ग्राह्य धरण्यात येते. तसेच इतर कोणत्याही संस्थांमध्ये काम करणा-या कर्मचा-याने समजा सलग 4 वर्ष 8 महिने काम केले असेल तर असा कर्मचारी देखील ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी पात्र असतो.

(हेही वाचाः T-20 World Cup 2024 मध्ये येणार मोठा ट्विस्ट, फॉरमॅटमध्ये ‘असा’ होणार बदल)

नोकरी सोडण्याआधी असणारा नोटीस पिरिएड देखील ग्रॅच्युइटीमध्ये मोजला जातो. फक्त कोणत्याही कर्मचा-याला जास्तीत जास्त 20 लाख रुपये ग्रॅच्युइटी मिळू शकते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here