भारतात विषारी सापांच्या पाच प्रमुख जाती आहेत. मण्यार, घोणस, फुरसे, चापडा आणि समुद्रसर्प या पाच सापांच्या प्रमुख जातींसह विषारी नागही भारतात आढळतो. या पाच सापांसोबतच पिवळसर, तपकिरी गव्हाळ, करड्या आणि काळ्या रंगाचा नागही आढळून येतो. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात नागरी वसाहतीत नाग येण्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे. नाग किंवा साप आढळून आल्यास १९२६ या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
सर्पदंश कसे टाळता येतील?
- घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा.
- घराजवळील फांद्या आणि भिंतीवरील भेगा बुजवून टाका.
- जंगल परिसराजवळ राहत असल्यास अंधारात घराबाहेर जाताना बॅटरीचा वापर करा.
- जंगल परिसरात फिरताना पायात कायम बूट घाला.
- तलाव, नदी, अडगळीची जागा, दगड-विटांच्या ढिगाऱ्यातून जाताना बॅटरी आणि काठी सोबत ठेवा.
- शेतातून किंवा जंगलातून जाताना पायवाटेचा वापर करा.
- मोठ्या वाढलेल्या गवतातून जाणे टाळा.
- समुद्रकिनारी चौपाट्यांवर फिरताना बरेचदा समुद्रसर्प निपचित पडलेले दिसतात. समुद्रसर्प मेलेले आहेत असे समजून त्यांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका.
- घरातील आणि परिसरातील कचऱ्याची योग्य रितीने विल्हेवाट लावा.
(हेही वाचा – Soldier Accident : लडाखमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने 9 जवानांचा मृत्यू , 1 गंभीर जखमी)
सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार –
- जखम स्वच्छ पाण्याने किंवा डेटॉलच्या पाण्याने धुवावी.
- सर्पदंश झालेल्या जागेवर क्रेप बॅंडेज किंवा आवळपट्टी बांधून दर दहा मिनिटांनी पाच ते दहा सेकंद सैल सोडावी.
- रुग्णाला चहा, कॉफी, दूध इतर पेय किंवा खाद्यपदार्थ खायला देऊ नका.
- सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चालत किंवा धावत रुग्णालयात नेऊ नका.
सर्पदंशावरील औषध –
सर्पदंश झालेल्या रुग्णाला प्रतिविष (लायफोलाईजड एन्टी स्नेक व्हेनम सिरम) द्यावे लागते. हे इंजेक्शन सर्व सरकारी आणि नगरपालिकेच्या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असते. प्रतिविष सर्पदंश झालेल्या प्रत्येक व्यक्तीला नसाद्वारे दिली जाते. प्रतिविष पाच वर्ष टिकते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community