गणपतीला रेल्वे गाड्या फुल्ल! असे बुक करा Confirm Tatkal तिकीट, जाणून घ्या प्रक्रिया

203

गणपतीला मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतात. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी दरवर्षी गणपती विशेष गाड्या सोडण्यात येतात. परंतु कोरोनानंतर २ वर्षांनी यंदा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होणार असल्याने या विशेष गाड्यांचे आरक्षण सुद्धा फुल्ल झालेले आहे. अशा परिस्थितीत चाकरमानी तात्काळ तिकीट बुक करून कोकणात प्रवास करू शकतात. IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही तात्काळ तिकीट कसे बुक कराल याची संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे…

( हेही वाचा : Monsoon Road Trip : पावसाळ्यात रोड ट्रिपसाठी ‘हे’ आहेत देशातील सर्वात सुंदर मार्ग)

तात्काळ तिकीट कसे बुक कराल

  • तात्काळ तिकीट एक दिवस आधी बुक करता येते. तसेच तुम्हाला एसी(AC) तात्काळ तिकीट बुक करायचे असल्यास बुकिंगची वेळ सकाळी १० आणि स्लीपर कोचसाठी ११ वाजता तुम्ही तिकीट बुक करू शकता.
  • IRCTC वर लॉगिन करा अथवा तुमचे अकाउंट नसल्यास तुम्हाला Registration पूर्ण करावे लागेल.
  • प्रवासाची तारीख, प्रवासाचा वर्ग यासंदर्भात संपूर्ण माहिती द्या.
  • यानंतर प्रवासाचा कोटा (Quota) सिलेक्ट करून तात्काळ (Tatkal) पर्याय निवडा.
  • तात्काळ पर्यायाची निवड केल्यावर तुम्हाला ट्रेनची संपूर्ण यादी दिसेल.
  • तुम्हाला ट्रेनचा मार्ग आणि वेळ पहायची असेल तर तुम्ही ट्रेन शेड्यूलवर क्लिक करा.
  • तात्काळ कोटा सिलेक्ट करून तुम्ही Book Now या पर्यायावर क्लिक करा. तुम्ही एकावेळी जास्तीत जास्त ४ प्रवाशांचे तिकीट बुक करू शकता.
  • यानंतर तुम्ही प्रवासाची संपूर्ण माहिती पुन्हा तपासून व्हेरिफिकेशन करून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.

कन्फर्म तिकीट हवे असल्यास बनवा मास्टर लिस्ट

  • IRCTC अ‍ॅप डाउनलोड केल्यावर तुम्हाला मास्टर लिस्ट फिचरचा वापर करावा लागेल, या फिचरमध्ये प्रवासाची माहिती आधीच भरून ठेवा. ज्यामुळे तिकीट बुकिंगवेळी तुम्हाला पुन्हा माहिती भरावी लागणार नाही.
  • मास्टर लिस्ट फिचरमध्ये तुम्ही माहिती सेव्ह करू शकता. एसी डब्यांसाठी तत्काळ बुकिंग १० वाजल्यापासून तर स्लीपर कोचसाठी ११ वाजल्यापासून बुकिंग सुरू होते.
  • तत्काळ बुकिंग सुरू होण्याच्या पाच मिनिटे आधी तुम्ही लॉगइन करा. यानंतर रूट सिलेक्ट करा. मास्टर लिस्टमध्ये सेव्ह केलेली माहिती अ‍ॅड करा. त्यानंतर पेमेंट ऑप्शनमध्ये UPIचा पर्याय निवडून या माध्यमातून पेमेंट करा, यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल आणि तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.