रामनवमी कशी साजरी कराल? काय म्हणाले राज्य सरकार? वाचा… 

राज्य सरकारने वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राम नवमी उत्सवाच्या साजरीकरणावर निर्बंध घातले आहेत. 

131

राज्यातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढतच आहे. त्यामुळे राज्य सरकारने सध्या कडक निर्बंध लावले आहेत. त्यातच सण -उत्सवांवरही प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यानुसार राज्य सरकारने २१ एप्रिल रोजी होणारा राम नवमी हा उत्सवही कसा साजरा कराल, याविषयी सरकारने नियमावली जारी केली आहे.

शासनाच्या या आहेत सूचना!

  • श्रीरामनवमी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड 19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी हा उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
  • दरवर्षी श्रीरामनवमी साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजेसाठी जाता येणार नाही
  • तसेच मंदिरात भजन, किर्तन किंवा इतर कोणते सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत
  • मंदिराचे व्यवस्थापक/ विश्वस्त यांनी शक्य असेल तर ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी
  • कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत
  • कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या इतर निर्बंधांचे काटेकोर पालन करावे

(हेही वाचा : मंत्रालयात कोरोनाची सेंन्च्युरी… अशी आहे मंत्रालयातील कोरोना रुग्णसंख्या!)

महावीर जयंतीच्या साजरीकरणावर निर्बंध! 

राज्य सरकारने महावीर जयंती उत्सवाच्याही साजरीकरणावर निर्बंध घातले आहेत. २५ एप्रिल रोजी हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. या दिवशी कोणत्याही प्रकराच्या मिरवणुका काढू नये, असे म्हटले आहे. तसेच दर्शनासाठी मंदिरे बंद ठेवावीत असेही सरकारने म्हटले आहे. .

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.