तुमचा वीज मीटर बंद असेल तर देयक कसे आकारले जाते, जाणून घ्या…

106

प्रत्येक प्रापंचिक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे वीज देयक! दर महिन्याला घराच्या दारात जेव्हा विजेचे देयक पडते तेव्हा आधी नजर वीज बिलाच्या आकड्यावर जाते. यंदाच्या महिन्याचे वीज बिल किती आले, त्यावर महिन्याचे बजेट अवलंबून असलेली लाखो हजारो, लाखो कुटुंबे महाराष्ट्रात असतील. त्यातील अनेकांना त्यांचे वीज देयक कसे आकारले जाते, हेही माहीत नसते. त्यावर त्यावर कुणाकडे दाद मागायची याचीही कल्पना नसते. त्यामुळे अनेक जण जेवढे देयक आले, तेवढे निमुटपणे भरतात आणि गप्प होतात, अशा वेळी वीज देयक कसे आकारले जाते, अचानक वाढीव वीज देयक कसे येते, असे प्रश्न सर्वसाधारण सगळ्यांनाच पडतात, याची उत्तरे जाणून घेऊया!

सरासरी देयक का आणि कधी आकारले जाते?

जर काही कारणास्तव तुमच्या वीज मीटरचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग करणे शक्य झाले नाही, तर चालू महिन्यासाठी तुम्हाला सरासरी बिल पाठविले जाते. यावेळी मीटर रीडरकडून मीटरची सद्यस्थिती नोंद केली जाते. सरासरी वीज बिलांवर दर्शविलेली मीटरची सद्यस्थिती खालीलप्रमाणे असू शकते

  • फॉल्टी : जर मीटर सदोष/कार्यरत नसल्याचे आढळले तर सरासरी देयक आकारले जाते
  • लॉक : मीटर रीडिंग करताना ग्राहक परिसर लॉक केलेला आढळला तर वीज देयक सरासरी पाठवले जाते
  • मीटर चेंज : मीटर बदलले परंतु नवीन मीटरचा तपशील सिस्टममध्ये उपलब्ध नसेल तरीही सरासरी बिल आकारले जाते
  • इनअक्सेसिबल : जर मीटरचे पॅनेल स्पष्ट दिसत नसेल तर सरासरी देयक आकारले जाते
  • आर.एन.टी. (रीडिंग घेतले नाही) : मीटर रीडरने रीडिंग घेतले नाही तरीदेखील सरासरी वीज देयक आकारले जाते

(हेही वाचा धनुष्यबाण होणार कुणाचा, निवडणूक आयोगाचे काय आहेत निकष?)

सरासरी बिल म्हणजे काय?

जर काही कारणामुळे ग्राहकांचे मीटर रीडिंग होऊ शकले नाही, तर यापूर्वीच्या ३ महिन्यांच्या प्रत्यक्ष मीटर रीडिंगवर आधारित वापराची सरासरी म्हणजेच सरासरी युनिट्स होय.

नवीन इमारतीत घर असेल, मीटर बिघडले असेल तर 

जर तुमचे घर नवीन इमारतीतील घर असेल आणि मीटर बिघडला तर देयक मागील महिनाभराची सरासरी बिल पाठवले जाईल.

तुमचा मीटर रिडींग दिसत नसेल तर… 

जर तुमच्या मीटरचे स्क्रीन बिघडले असेल मीटर रिडींग दिसत नसेल, तर त्या महिन्याचे मीटर रिडींग मागील वर्षीच्या त्याच महिन्यातील मीटर रिडींगप्रमाणे वीज देयक आकारले जाते

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.