कशी ओळखाल खोटी नोट? RBI ने दिलेल्या ‘या’ मार्किंग्स बघा

खोट्या नोटांमुळे आजवर अनेकदा नागरिकांची फसवणूक झाल्याचे पहायला मिळाले आहे. बाजारात अलीकडे खोट्या नोटांची संख्या वाढल्याचेही आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळे खोट्या नोटा ओळखण्यासाठी आरबीआयकडून सतर्क करण्यात आले आहे. 500 च्या खोट्या नोटा ओळखण्यासाठी आता आरबीआयने नोटांवरील मार्किंग दिले आहे. या मार्किंग्स 500 च्या नोटेवर नसतील तर ती नोट खोटी आहे, असे आरबीआयने सांगितले आहे. 500 ची खरी नोट ओळखण्यासाठी आरबीआयने या 17 मार्किंग्स दिल्या आहेत.

(हेही वाचाः 500 च्या ‘या’ नोटा आहेत खोट्या? केंद्र सरकारचा मोठा खुलासा)

या आहेत मार्किंग्स

 1. नोटेच्या पुढच्या बाजूला डाव्या कोप-यात खाली Denominational स्वरुपात 500 आकडा दिसेल.
 2. त्याच खाली लेटेंट इमेजमध्ये Denominational स्वरुपात 500 आकडा लिहिलेला दिसेल.
 3. डाव्या बाजूला देवनागरीत आडवा ५०० आकडा दिसेल.
 4. गांधींचा फोटो नोटेच्या बरोबर मध्यभागी दिसेल.
 5. त्याशेजारी बारीक अक्षरांत भारत आणि India लिहिलेले दिसेल.
 6. गांधींच्या फोटोशेजारी असलेल्या उभ्या हिरव्या पट्टीवर भारत आणि RBI लिहिलेले आहे. ही हिरवी पट्टी वरच्या बाजूला धरल्यास तिचा रंग निळा होतो.
 7. वचननाम्यासह आरबीआयच्या गव्हर्नरची सही असेल.
 8. नोट उजेडात धरल्यावर नोटेच्या उजव्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत गांधींचा फोटो आणि 500 आकडा दिसेल.
 9. त्याखाली नोटेच्या नंबर हा डाव्या बाजूने छोट्या फॉंटमधून उजव्या बाजूला मोठ्या फाँटमध्ये झालेले दिसेल.
 10. नंबरच्या वर 500 हिरव्या अक्षरात 500 लिहिलेले दिसेल. हा आकडाही वरच्या बाजूला फिरवल्यास निळा होतो.
 11. उजव्या बाजूला अशोकस्तंभ दिसेल.
 12. अशोकस्तंभाच्या वर छोट्याशा अक्षरात 500 लिहिलेले दिसेल.
 13. नोटेच्या मागच्या बाजूला डावीकडे नोट छापल्याचे वर्ष दिसेल.
 14. त्याशेजारी असलेल्या रिकाम्या जागेत खालच्या बाजूला स्वच्छ भारत लिहिलेले दिसेल.
 15. त्याच्याशेजारी एका चौकटीत विविध भाषांमध्ये पाचशे रुपये लिहिलेले दिसेल.
 16. त्याबाजूला लाल किल्ल्याचे चित्र दिसेल.
 17. उजव्या कौप-यात सगळ्यात लर देवनागरीमध्ये ५०० लिहिलेले दिसेल.

तुमच्या नोटेवर आरबीआयने सांगितलेल्या या मार्किंग्स आहेत की नाही हे पहा आणि नोटांची सत्यता तपासा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here