कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना(EPFO)कडून 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचा-यांना देण्यात येणा-या पीएफचे व्याज कर्मचा-यांच्या पीएफ अकाऊंटवर जमा करण्यात येणार आहे. येत्या 30 जूनपर्यंत ही रक्कम कर्मचा-यांच्या खात्यावर जमा होईल, असे सांगण्यात येत आहे. 8.1 टक्के व्याजदराने ही रक्कम कर्मचा-यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. पण खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे किंवा नाही, यासाठी कर्मचा-यांना अकाऊंट बॅलेन्स चेक करावा लागणार आहे.
(हेही वाचाः EPFO: या चुका झाल्या तर तुमचे PF अकाऊंट बंद होऊ शकते)
कसा चेक कराल पीएफचा बॅलेन्स?
- पीएफ खातेधारक EPFO च्या 011-22901406 या टोल फ्री नंबरवर रजिस्टर मोबाईल नंबरद्वारे मिस्ड कॉल देऊन पीएफचा अकाऊंट बॅलेन्स चेक करू शकतात.
- आपल्या रजिस्टर नंबरवरुन EPFO UAN LAN टाईप करुन 7738299899 या नंबरवर SMS करुन देखील पीएफ खातेधारक आपला अकाऊंट बॅलेन्स चेक करू शकतात.
- EPFO च्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करुन UAN no. आणि Password द्वारे लॉग इन करुन, Passbook ऑप्शनद्वारे खातेधारकांना आपला पीएफ बॅलेन्स चेक करता येईल.
- UMANG app डाऊनलोड करुन त्यात EPFO ऑप्शन निवडा. त्यानंतर UAN no. आणि OTP द्वारे लॉग इन करुन Passbook ऑप्शनद्वारे पीएफ खातेधारकांना आपला अकाऊंट बॅलेन्स चेक करता येईल.
(हेही वाचाः EPFO: आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून अकाऊंटवर येणार PF चे व्याज)
ई-नॉमिनेशन बंधनकारक
EPFO कडून आता पीएफ धारकांना आपले ई-नॉमिनेशन(EPFO e-nomination) करणे बंधनकारक असणार आहे. यामुळे पीएफ धारकांच्या कुटुंबीयांना संरक्षण मिळणार आहे. ई-नॉमिनेशन न केल्यास धारकांना आपल्या पीएफचा बॅलेन्स चेक करता येणार नसल्याचे, तसेच कुटुंबीयांना मिळणारा लाभही मिळणे अवघड होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community