आजकालच्या जगात आपल्याला काही माहित नसले की आपण लगेचच गुगल सर्च करत संबंधित माहिती मिळवतो. याचसोबतच एखाद्या व्यक्तीचे नाव सर्च केल्यास, त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती आपल्याला मिळते. यामुळे अनेकदा तुमचे खासगी आयूष्य धोक्यात येण्याची शक्यता असते. परंतु आता तुम्ही तुमची खासगी माहिती गुगल सर्चवरून काढून टाकू शकता. याबाबत गुगलचे पॉलिसी हेड मिचेल चॅंग यांनी अधिकृत माहिती दिली.
( हेही वाचा : ‘बेस्ट’चे जुने स्मार्टकार्ड ८ दिवसांत होणार बंद )
खासगी माहिती काढून टाका
खासगी किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ नये म्हणून गुगलने नवे धोरण जाहीर केले आहे. आता तुम्ही तुमचे नाव, मोबाइल क्रमांक, ई-मेल, फोटो किंवा इतर कोणतीही खासगी माहिती गुगलवरून काढून टाकू शकता यासाठी तुम्हाला गुगलला मेल करावा लागेल.
गुगलने केले स्पष्ट
हा ऑफिशियल मेल (Official Mail) गुगलला प्राप्त झाल्यावर, वापरकर्त्याच्या मागणीनुसार त्याचे वैयक्तिक तपशील गुगल प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले जातील. गुगलवरील माहितीचा वापर करून अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत यामुळेच, ज्या माहितीमुळे युजर्सची फसवणूक होण्याची शक्यता आहे अशी सर्व माहिती काढली जाईल असेही गुगलने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community