2000 Rupees Notes : २००० ची नोट सुटी करा शेवटची संधी….

RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी माहिती दिली आहे.

136
2000 Rupees Notes : २००० ची नोट सुटी करा शेवटची संधी....
2000 Rupees Notes : २००० ची नोट सुटी करा शेवटची संधी....

तुमच्याकडे अजूनही २००० रुपयाच्या नोटा असतील तर ही माहिती तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे. तर या २००० च्या नोटा बदलण्याचा शनिवार (७ ऑक्टोबर) हा शेवटचा दिवस आहे. तर त्या बँक शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्याची ही शेवटची संधी आहे. मात्र, उद्यापर्यंत जर या नोटा जमा केल्या नाहीत, तर पुढे काय? याबाबत RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी माहिती दिली आहे. त्यांनी याबाबत दोन मार्ग सांगितले आहेत. ( 2000 Rupees Notes)

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या निर्णयांची घोषणा करताना दास यांनी सांगितले की, आरबीआयकडे अद्याप २००० रुपयांच्या१२०००कोटी रुपयांच्या नोटा परत येणं बाकी आहे. म्हणजेच ३.५६ लाख कोटी रुपयांच्या २००० रुपयांच्या नोटांपैकी केवळ ८७ टक्के नोटा परत आल्या आहेत. १२००० कोटी रुपयांच्या या नोटा अजूनही शिल्लक आहेत. त्या परत करण्याचा किंवा बदलून देण्याची उद्या शेवटचा दिवस आहे.

(हेही वाचा : Maharashtra GST Department : महाराष्ट्राच्या जीएसटी विभागाचा दिल्लीत बोलबाला; ‘या’ कामगिरीसाठी मिळाला सुवर्ण पुरस्कार)

अशा पद्धतीने करू शकता नोटा बदल
७ ऑक्टोबर २०२३ नंतर २००० रुपयांच्या नोटा परत करायच्या असतील तर आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दोन मार्ग सांगितले आहेत. जर ८ ऑक्टोबर २०२३ पासून बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये २००० रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलल्या जाणार नाहीत, तर तुमच्याकडे दोन मार्ग आहेत. याबाबत बोलताना शक्तीकांत दास म्हणाले की, देशातील अनेक राज्यांमध्ये आरबीआयची इश्यू ऑफिसेस आहेत जिथे या २००० रुपयांच्या नोटा जमा केल्या जाऊ शकतात. ज्या लोकांकडे २००० रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी RBI च्या १९ कार्यालयांना भेट देऊन या २००० रुपयांच्या नोटा बदलून घ्याव्यात किंवा जमा कराव्यात. या हेही पहा र्यालयांमध्ये एका वेळी फक्त २०,००० रुपयांच्या नोटा बदलू शकतात. जर तुम्हाला भारतातील बँक खात्यात पैसे जमा करायचे असतील तर यासाठी कोणतीही मर्यादा नाही. ( 2000 Rupees Notes)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.