आजच्या काळात परदेशी फिरायचे असेल तर पासपोर्ट हे मुख्य ओळखपत्र असते. पासपोर्टशिवाय तुम्ही दुसऱ्या देशात प्रवास करू शकत नाही. अनेकदा पण समजा तातडीने बाहेरगावी जायची वेळ आली आणि जर पासपोर्ट नसेल तर मोठी पंचाईत होते. पण आता पासपोर्ट सेवेत भारत सरकारकडून काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामुळे लोकांना झटपट पासपोर्ट मिळणे सोपे होणार आहे.
( हेही वाचा : सर्वसामान्यांना महागाईचा झटका, ‘अमूल’चं दूध महागलं; ‘असे’ असतील नवे दर)
ऑनलाईन पासपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला passport seva या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. याठिकाणी तुम्ही तत्काळ पासपोर्ट हा पर्याय निवडू शकता. येथे Apply केल्यावर तुमच्या घरच्या पत्त्यावर ४ ते ८ दिवसात पासपोर्ट लगेच तुमच्या घरी येईल.
तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज कसा करायचा?
- सर्वप्रथम तुम्हाला पासपोर्टच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
- याठिकाणी तुमचा आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन प्रक्रिया पूर्ण करा.
- लॉगिन पूर्ण झाल्यावर तुम्ही तत्काळ पासपोर्ट हा पर्याय निवडा.
- अर्ज डाऊनलोड करा आणि फॉर्म भरून सबमिट करा.
- पेमेंट प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुम्हाला ऑनलाईन पेमेंटची प्रिंट काढावी लागेल. यानंतर जवळच्या पासपोर्ट केंद्रात Appointment बुक करा.
- तत्काळ पासपोर्टसाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे आकारले जातील.
तत्काळ पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रे
- मतदार ओळखपत्र
- सेवा फोटो ओळखपत्र
- SC/ST/OBC प्रमाणपत्र
- स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र
- शस्त्र परवाना
- शिधापत्रिका
- मालमत्तेची कागदपत्रे
- पेन्शन दस्तऐवज
- रेल्वे फोटो ओळखपत्र
- पॅन कार्ड
- बॅंक पासबुक
- मान्यताप्राप्त संस्थेचे विद्यार्थी ओळखपत्र
- चालक परवाना
- जन्म प्रमाणपत्र
- गॅस कनेक्शन बिल