२९ सप्टेंबर २०१० ला केंद्र सरकारने आधार कार्ड लॉन्च केले, तेव्हापासून त्याचे महत्व वाढत गेले आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य आहे. आता या आधार कार्डमुळे सर्वसामान्यांची आणखी एक समस्या दूर होणार आहे. अडीअडचणीत सर्वांनाच पैशाची गरज भासते. तेव्हा कर्जाऊ रक्कमेसाठी बॅंकेकडे हात पसरावे लागतात. बॅंकेकडून पैसे मिळतात मात्र त्याची प्रक्रिया वेळखाऊ असते. यापुढे तसं होणार नाही. फक्त आधार कार्ड दाखवल्यावर लोन मिळण्याची सुविधा काही बॅंकानी उपलब्ध केली आहे.
लोन मिळेल पण…
फक्त आधार कार्डच्या आधावर कर्ज मिळू शकतं. त्यावर निश्चितच काही मर्यादा आहेत. यात दोन लाखाच्या पुढचं लोन मिळणार नाही. क्रेडीट स्कोर किमान ७५० किंवा त्यावर असणं आवश्यक आहे. जर क्रेडीट स्कोर त्यापेक्षा कमी असेल तर लोन मिळणार नाही. एसबीआय, एचडीएफसी, कोटक या सारख्या इतर बॅंका अशा प्रकारे कर्ज देणार आहेत.
(हेही वाचा श्रद्धा वालकर हत्याकांडावरील निकाल दिल्ली न्यायालयाने राखून ठेवला )
काही मिनिटात पैसे खात्यात
अॅप्लिकेशन दिल्यापासून पैसे खात्यात येईपर्यंत फक्त काही मिनिटांचा कालावधी लागतो. या स्टेप्स फॉलो केल्यावर त्वरीत लोन मिळेल…
- खातं असलेल्या बॅंकेची वेबसाईट किंवा मोबाईल अॅप उघडा
- मोबाईल नंबर टाकल्यावर ओटीपी येईल
- न चुकता ओटीपीचे नंबर भरा
- पर्सनल लोनचा पर्याय शोधा
- लोनची रक्कम भरा
- विचारलेल्या इतर प्रश्नांची पूर्तता करा
- पॅन कार्डची माहिती भरा
- लोन अॅप्लिकेशची सरकारी बॅंकाद्वारे तपासणी होईल
- काही मिनिटांत लोनची रक्कम खात्यात जमा होईल