व्हॉट्सअपवर कसं मिळवाल मेट्रोचं तिकीट?

178

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मेट्रोच्या दोन नव्या मार्गिकांचे उद्घाटन केल्यामुळे प्रवाशांना फार मोठा फायदा होत आहे. प्रवाशांना अत्याधुनिक सेवा देण्यासाठी मेट्रो रेल्वेकडून विविध सुविधा देण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून आता मेट्रो-१ चे तिकीट प्रवाशांना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर देखील उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे.

कसे मिळणार व्हॉट्सअप तिकीट?

पेपर क्यू-आर तिकीटाचा विस्तार करुन मुंबई मेट्रो वन प्रा. लि.(एमएमओपीएल)ने व्हॉट्सअपच्या माध्यमातून तिकीट सेवा उपलब्ध करुन दिली आहे. गुरुवारी या सेवेचे उद्घाटन करण्यात आले असून, शुक्रवारपासूनच प्रवाशांना व्हॉट्सअपवर तिकीट मिळण्यास सुरुवात झाली आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-3 व्हॉट्सअप सेटिंग्समधील क्यू-आर कोड स्कॅनरचा वापर करुन मेट्रो स्थानकावरील क्यू-आर कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशांच्या व्हॉट्सअपवर हे तिकीट मिळणार आहे.

(हेही वाचाः बेस्टच्या ‘या’ कार्डवर आता शॉपिंगही करता येणार)

जगातली पहिली मेट्रो

सध्या रोख रक्कम देऊन प्रवाशांना व्हॉट्सअपवर तिकीट मिळवता येणार आहे. पण लवकरच ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून सुद्धा हे तिकीट प्रवाशांना उपलब्ध होईल, अशी माहिती एमएमओपीएल कडून देण्यात येत आहे. इतकंच नाही तर व्हॉट्सअपवर तिकीट उपलब्ध करुन देणारी मेट्रो- 1 ही जगातील पहिली मेट्रो असल्याचेही एमएमओपीएल कडून सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः देशी तळीरामांचे विदेशी प्रेम, कोट्यवधी लिटर विदेशी दारू रिचवली)

मुंबई मेट्रोकडून प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सुविधा देण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहेत. बँक कॉम्बो कार्ड, मोबाईल क्यू-आर तिकीट, लॉयल्टी प्रोग्रॅम अशा अनेक पर्यायांचा वापर करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.