कोरोनाच्या दोन लसी घेतल्या असतील तर काढा लोकलचा ई-पास…कसा ते वाचा…

ई-पास मिळवण्यासाठी https://epassmsdma.mahait.org ही लिंक शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

86

कोरून सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वेतून प्रवास करता यावा, यासाठी आता ऑनलाईन ई-पास सुविधा महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ असे त्याचे नाव असून या पद्धतीमुळे नागरिकांना प्रवासासाठी अतिशय सुलभतेने ई-पास मिळवणे शक्य होणार आहे. त्यासाठी https://epassmsdma.mahait.org ही लिंक शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

https://epassmsdma.mahait.org ह्या लिंक चा उपयोग करून मुंबईकरांना आता युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास मिळू शकतील. या लिंक सर्व वेब ब्राऊजरवर उपलब्ध असेल. हा ई-पास मोबाईलमध्ये जतन करुन, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडकीवर सादर केल्यानंतर नागरिकांना रेल्वे प्रशासनाकडून थेट मासिक प्रवास पास उपलब्ध होईल. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर पुन्हा ऑफलाईन पडताळणीची आवश्यकता राहणार नाही. ज्या नागरिकांचे कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत आणि दुसरा डोस घेवून किमान १४ दिवस पूर्ण झाले आहेत, ते नागरिक या ई पाससाठी पात्र असतील. जे पात्र नागरिक पाससाठी अर्ज करतील, त्यांचे कोविड लसीकरण पूर्ण झाल्याची (दुसरा डोस घेवून १४ दिवस पूर्ण झाल्याची) पडताळणी ह्या लिंकवर आपोआप होईल. त्यामुळे हा ई पास अर्थात युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास कसा मिळू शकतात याची ही थोडक्यात माहिती पुढे देत आहोत.

(हेही वाचा : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती आहे शिक्षणसम्राट मंत्री? भातखळकरांनी जारी केली यादी…वाचा…)

ई पास मिळवण्यासाठी काय कराल?

  • सर्वप्रथम पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.
  • त्यावर Travel Pass for Vaccinated Citizens यावर क्लिक करावे.
  • नागरिकांनी आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेलाच मोबाईल क्रमांक नमूद करावा.
  • त्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल
  • ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक समोर दिसेल.
  • त्यानंतर ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करा
  • त्यात सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे.
  • मोबाईल गॅलरीतून किंवा जागीच छायाचित्र (सेल्फी) काढून देखील अपलोड करता येईल.
  • त्यानंतर ४८ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास करीता एसएमएस द्वारे लिंक प्राप्त होईल
  • लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाईलमध्ये जतन करुन ठेवा
  • त्या आधारे  उपनगरीय रेल्वे स्थानकांवर रेल्वे पास मिळवता येईल
  • या पासच्या आधारे १५ ऑगस्ट २०२१ पासून  उपनगरीय रेल्वे प्रवास करता येईल
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.