भगवान श्री रामाच्या उपासनेत त्यांच्या महिमेची स्तुती करणाऱ्यांसाठी श्रीराम स्तुती (Shri Ram Stuti) ही एखाद्या ढालीसारखे काम करते. याचे रोज पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. त्याला सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. जो कोणी भक्तीभावाने, श्रद्धेने श्रीराम स्तुती करतो, त्याला भगवान रामाच्या कृपेने आणि आशीर्वादाने मोठी संकटे आणि आजार देखील स्पर्श करु शकत नाहीत.
श्रीराम स्तुती (Shri Ram Stuti) करण्यासाठी रामरक्षा स्तोत्र परिणामकारक आहेत, त्यात 38 श्लोक आहेत, त्यापैकी बहुतेक अनुष्टुप् श्लोकांमध्ये आहेत आणि त्यामुळे ते लवकर लक्षात राहतात. या स्तोत्राची कीलक श्री हनुमानजी आहेत आणि हे चमत्कारिक स्तोत्र बुधकौशिक ऋषींकडून प्राप्त झाले आहे. असे मानले जाते की, भगवान शंकराने त्यांना हे कल्याणकारी स्तोत्र स्वप्नात उपदेशाच्या रुपात सांगितले होते.
(हेही वाचा Gyanvapi : देशभरात गाजलेल्या ज्ञानवापीचा काय आहे इतिहास? )
श्रीराम स्तुतीचे चमत्कारिक फायदे
असे मानले जाते की रामरक्षा स्तोत्र सिद्ध केल्यावर खूप फायदा होतो. उदाहरणार्थ, त्याच्या शुभ प्रभावामुळे, एखाद्या व्यक्तीला आयुष्यात कधीही ज्ञात अज्ञात शत्रूची भीती वाटत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिद्ध झालेल्या रामरक्षा स्तोत्राचा फायदा दुसर्या व्यक्तीला संकटातून सोडवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. असे मानले जाते की दररोज श्रीराम स्तुती केल्याने साधक सर्व प्रकारचे अपघात, आकस्मिक संकट आणि इतर सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित राहतो.
Join Our WhatsApp Community