पनीर शुद्ध आहे की अशुद्ध? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरुन खात्री करुन घ्या

दुधापासून तयार होणारे पनीर हा अनेकांचा आवडीचा पदार्थ आहे. स्पेशल भाज्या बनवण्यासाठी हॉटेलमध्ये पनीरचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पण अनेकदा सर्रासपणे बनावट पनीर देखील बाजारात मिळते. यामुळे अनेकदा पोटदुखीसारखे गंभीर आजार देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे अस्सल शुद्ध पनीर तपासण्यासाठी काही ट्रिक्सचा वापर करणे गरजेचे आहे.

(हेही वाचाः QR Code स्कॅनद्वारे Transaction करताना आठवणीने करा ‘हे’ काम, नाहीतर होईल मोठी फसवणूक)

या आहेत सोप्या ट्रिक्स

  • भेसळयुक्त पनीर ओळखण्यासाठी आधी पनीर पाण्यात उकळून घ्या. थंड झाल्यानंतर त्यात तूर डाळीची पावडर किंवा सोयाबीनची पावडर टाकून थोडा वेळ ठेवा. जर पनीरचा रंग लाल होऊ लागला तर त्यात युरिया किंवा डिटर्जन्टचा वापर करण्यात आला आहे, असे समजा.
  • तसेच पनीरची शुद्धता ओळखण्यासाठी आयोडीनचा देखील वापर करता येतो. पनीर पाण्यात उकळून त्यात आयोडीन टिंक्चरची टाका. जर पनीरचा रंग निळा झाला तर ते पनीर भेसळयुक्त आहे, असे समजा.
  • बनावट पनीर ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पनीर हाताने कुस्करुन बघा. भेसळयुक्त पनीर हे स्किम्ड मिल्कपासून बनवलेले असल्यामुळे ते हाताने कुस्करल्यावर त्याचा लगेच चूरा होतो. पण शुद्ध पनीरचा पटकन चूरा होत नाही. त्यामुळे या ट्रिक्स वापरुन आपण बनावट पनीरपासून होणारे दुष्परिणाम टाळू शकतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here