आधार कार्डला कसे लिंक कराल व्होटिंग कार्ड? केंद्र सरकारचा नवा नियम

केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार आता मतदान ओळखपत्र(Voter Id)कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे आता नागरिकांना आता हे लिंकिंग करावे लागणार आहे. डबल व्होटिंग टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले आहे. आधार कार्डशी व्होटर आयडी कार्ड कसे लिंक करायचे,याबाबतची माहिती जाणून घेणे आवश्यक असणार आहे.

(हेही वाचाःकेंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता आधार कार्डला लिंक करावे लागणार व्होटिंग कार्ड! कधीपासून होणार नियम लागू?)

असे करा लिंकिंग

  • आधारशी व्होटर आयडी कार्ड लिंक करण्यासाठी मतदारांना सगळ्यात आधी व्होटर आयडी कार्डची ऑफिशियल वेबसाईट https://voterportal.eci.gov.in/ वर रजिस्टर करावे लागेल
  • त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी किंवा व्होटर आयडी नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग-इन करावे लागेल
  • त्यानंतर राज्य, जिल्हा आणि इतर माहिती भरावी लागेल
  • नंतर Search बटन क्लिक करुन इतर डेटा समाविष्ट करुन feed aadhar number वर क्लिक करा
  • आता submit बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचे आधार आणि व्होटर आयडी कार्ड लिंकिंग पूर्ण होईल

लिंक करायचे नसेल तर काय कराल?

ज्या मतदारांना आधार कार्डला व्होटर आयडी कार्ड लिंक करायचे नाही किंवा ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांना MGNREGS जॉब कार्ड, फोटो असलेले बँक पासबूक,ड्रायव्हिंग लायसन्स,पॅन काईड,पासपोर्ट,हेल्थ इन्श्युरन्स स्मार्ट कार्ड,पेन्शन प्रमाणपत्र,सरकारी सेवा ओळखपत्र,खासदार,आमदार किंवा विधान परिषद सदस्यांनी प्रमाणित केलेले ओळखपत्र,सामाजिक न्याय मंत्रालयाने जारी केलेले युनिक आयडी कार्ड या कागदपत्रांद्वारे आपले व्होटर आयडी कार्ड व्हेरिफाय करुन घ्यावे लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here