फॅक्ट्रीमध्ये नूडल्स बनवण्याची ‘ही’ प्रक्रिया पाहिली तर तुम्ही कधीच नूडल्स खाणार नाही

220

आजच्या युगात अनेकांना फास्ट फूड आवडतं. पूर्वी बाहेरचं खाणं हे वर्ज्य असायचं किंवा घरचे सांगायचे की ’बाबा रे, बाहेरचं खाऊ नकोस पोट बिघडेल.’ परंतु आता तर मोठ्या माणसांनाही बाहेरचं खाणं आवडतं. मग ते लहान मुलांना काय कपाळ शिस्त लावणार? फास्ट फूडमध्ये चायनिज हा प्रकार खूप आवडता. कधीही, कुठेही रस्त्याच्या कडेला तुम्हाला चायनीजचा ठेला लागलेला दिसेल.

आपण घरी बर्‍याचदा ब्रॅंडेड पॅकेट्स आणतो, मात्र रस्त्याच्या कडेला विकले जाणारे नूडल्स कसे तयार होतात असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? पीएफसी क्लबचे संस्थापक चिराग बरजात्या यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. यापुढे रस्त्याच्या बाजूला असणार्‍या चायनीजच्या स्टॉल्सवर तुम्ही खाणं सोडून द्याल.

(हेही वाचा महिला खेळाडूंसाठी महिला प्रशिक्षकच नेमावेत; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मागणी)

हा व्हिडिओ शेअर करताना चिराग बरजात्या लिहितात, “When was the last time you had road side chinese hakka noodles with schezwan sauce?”  हा व्हायरल व्हिडिओ अतिशय धक्कादायक आहे. नूडल फॅक्ट्रीतला हा व्हिडिओ आहे. आधी मिक्सरमध्ये पीठ घातलं जातं. मग मशीनचा वापर करुन पिठाचं नूडल्सच्या आकारात रुपांतर केलं जातं.

लिंक: https://twitter.com/chiragbarjatyaa/status/1615707103527858176

खटकणारी गोष्ट म्हणजे ही सर्व प्रक्रिया करत असताना हातमौजे घातले जाते. नूडल्स उकडल्यानंतर जमिनीवर टाकले जातात आणि त्यानंतर पॅकिंग होते. हा सगळा गलिच्छपणा पाहून आपल्याला त्रास होतो. आपल्यापैकी अनेकांनी रस्त्यावरील नूडल्स खाल्ले असतील. रस्त्यावरील अन्न खाताना स्वच्छता पाळली जात आहे का, याची खात्री आपण करत नाही. घरात मात्र आपण स्वच्छतेचे सगळे नियम पाळतो. बाहेर खाताना हे नियम आपण विसरुन जातो.

या व्हिडिओच्या खाली अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. आणि या कमेंट्समधून लोकांचा उद्रेक दिसत आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की, फक्त नूडल्स नव्हे तर पाणी पुरी, सॅंडविच अशा अनेक खाद्यपदार्थांच्या बाबतीत तीच कथा आहे. मग तुम्ही आजपासून रस्त्यावरील खाण्याच्या बाबतीत स्वच्छतेची काळजी घेणार आहात की नाही?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.