Google Map : नेटवर्क गेल्यावरही रस्ता दाखवेल गूगल मॅप; जाणून घ्या कसं वापरायचं हे ॲप…

Google Maps मध्ये Offline Maps हे फीचर मिळते. हे फीचर विना इंटरनेट पण काम करते.

1203
Google Map : नेटवर्क गेल्यावरही रस्ता दाखवेल गूगल मॅप; जाणून घ्या कसं वापरायचं हे ॲप...

नवीन रस्त्यावरुन जाताना, नवीन शहराकडे, नवीन ठिकाणी जाताना आता गुगलचे नॅव्हिगेशन ॲप Google Maps चा जास्त उपयोग होतो. परंतु अनेकदा फोनमध्ये नेटवर्क नसल्यामुळे किंवा स्पीड कमी असल्यामुळे लोकांना मॅप वापरत येत नाही. आणि बऱ्याचदा अशी समस्या आजूबाजूला कोणी नसेल अश्या ठिकाणी येते. परंतु तुम्हाला गुगल मॅपवरील एक सोपी ट्रिक आहे  जिच्या मदतीनं तुम्ही इंटरनेटविना देखील गुगल मॅप सहज वापरू शकता. (Google Map )

Google Maps मध्ये Offline Maps

तुम्ही गुगल मॅप लावून रस्त्यावरुन वाहन चालवत असाल आणि अचानक नेटवर्कची अडचण आली तर? मग काय तुम्हाला वाटेल या आडवळणी रस्त्यावर आता कोणाची वाट पाहत किती वेळ ताटकळायचं, नाही का. पण गुगल मॅपमध्ये एक सीक्रेट फीचर आहे. तुम्ही विना इंटरनेट सुद्धा हे फीचर उपयोगात आणू शकता. पण त्यासाठी हे काम इच्छितस्थळी निघणाऱ्यापूर्वी आठवणीने करावे लागणार आहे. तुम्हाला Google Maps मध्ये Offline Maps हे फीचर मिळते. हे फीचर विना इंटरनेट पण काम करते. हे फीचर कसे वापरात आणायचे हे पाहुयात.. (Google Map )

(हेही वाचा : Puntin on PM Modi : पुतीन यांच्याकडून नरेंद्र मोदींचे कौतुक ;म्हणाले आजच्या जगात हे सोपे नाही)

 

with out internet Google Map offline फीचर कस वापरायचं
  • सर्वात अगोदर मोबाईलमध्ये गुगल मॅप्स एप ओपन करा. एप उघडल्यावर उजव्या बाजूला वरती प्रोफाईल पिक्चरच्या आयकॉनवर क्लिक करा.
  • या पिक्चरवर टॅप केल्यानंतर अनेक पर्याय समोर येतील. याठिकाणी तुम्हाला Offline Maps चा पर्याय दिसेल
  • ऑफलाईन मॅप्सचा पर्याय क्लिक करा. स्क्रीनवर तुम्हाला Select Your Own Map हा पर्याय दिसेल.
  • या पर्यायावर तुम्हाला इच्छित स्थळ या बॉक्समध्ये आणावे लागेल. त्यामुळे एरियाचा मॅप डाऊनलोड होईल.
  • स्क्रीनवर तुम्हाला डाऊनलोडचा पर्याय मिळेल. पण त्यासाठी मोबाईलमध्ये फ्री स्पेस लागेल.
  • मॅप्स डाऊनलोड झाल्यानंतर नेटवर्क नसले तरी, विना इंटरनेट तुम्हाला या फीचरच्या मदतीने इच्छित स्थळ गाठता येईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.