पेन्शनधारकांचा चेहराच ठरणार आता हयातीचा दाखला!

157

पेन्शनधारकांना दरवर्षी त्यांच्या हयातीचा दाखला देणे क्रमप्राप्त असते. त्यासाठी वृद्धापकाळात पेन्शनधारकांना घराबाहेर पडावे लागत होते. संबंधित आस्थापनाकडे अंगठ्याचा ठसा पाठवावा लागत असे. परंतु आता केंद्र सरकारने यात आणखी प्रगती केली आहे. केंद्राने यासाठी ‘फेस रेकगनायझेशन सिस्टम’ विकसित केली आहे. या माध्यमातून ऍप डाऊनलोड करावा लागेल, त्याआधारे पेन्शनधारक स्वतःचा चेहरा त्या ऍप वर अपलोड करता येईल. पेन्शनधारकाचा चेहराच त्यांच्या हयातीचा दाखल ठरणार आहे.

पेन्शनधारकांनी दरवर्षी हयातीचा दाखला दिला नाही, तर त्यांची पेन्शन बंद केली जाते. पण आता पेन्शनधारकांची या हयातीच्या दाखल्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. कारण केंद्र सरकार लवकरच पेन्शनधारकांसाठी फेस रेकगनायझेशन सिस्टम ही हायटेक टेक्नोलॉजी आणणार आहे. टेक्नोलॉजीनुसार आता पेन्शधारकाचा चेहरा हाच जिवंत असल्याचा पुरावा असेल. राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांच्या हस्ते या नव्या तंत्रज्ञानाचे अनावरण करण्यात आले. हे अॉप जीवन प्रमाण संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे.

(हेही वाचा गिरणी कामगारांचा घरासाठी संघर्ष सुरूच!)

ऍपचा कसा उपयोग करणार?

  • जीवन प्रमाण संकेतस्थळ https://jeevanpramaan.gov.in/package/download येथे भेट द्या
  • स्क्रोल डाऊन करून त्यात ईमेल, कॅप्चा कोड टाकून डाऊनलोडकडे क्लीक करा
  • पेन्शनधारकाला ओटीपी येईल, तो टाकून सब्मीटकडे क्लीक करा
  • Android Mobile Face App Download यावर क्लीक करा
  • पेन्शनधारकाला जीवन प्रमाण फेस ऍप ची लिंक मिळेल, त्यावर क्लीक करून डाऊनलोड करा
  • Face Recognition Appचा कसा वापर कराल?
  • AadhaarFaceRD app गुगल ऍपवरून डाऊनलोड करा
  • Jeevan Pramaan face application डाऊनलोड करा
  • पेन्शनधारकाने स्वत: चेहरा स्कॅन करावा, एक वेळचा पासवर्ड मिळेल
  • पेन्शनधारकाने स्वत:ची माहिती भरावी, स्वत: चेहरा स्कॅन करावा
  • सब्मीट बटणवर क्लीक करावे, त्यानंतर मोबाईल नंबरवर लिंक मिळेल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.