Ayodhya Ram Mandir: ३ अब्ज वर्षे जुन्या खडकापासून कशी साकारली रामललाची मूर्ती ? जाणून घ्या…

रामदास नावाची व्यक्ती शेतजमिनीचे सपाटीकरण करताना ही शिला आढळून आली.

254
Ayodhya Ram Mandir: ३ अब्ज वर्षे जुन्या खडकापासून कशी साकारली रामललाची मूर्ती ? जाणून घ्या...
Ayodhya Ram Mandir: ३ अब्ज वर्षे जुन्या खडकापासून कशी साकारली रामललाची मूर्ती ? जाणून घ्या...

५०० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रभु श्रीराम अखेर अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले. प्रभु श्रीरामाची मूर्ती म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. ही मूर्ती ५१ इंची आहे. मंदिराच्या गर्भगृहात रामललांना बसवण्यात आले आहे. म्हैसूरच्या एचडी कोटे तालुक्यातील जयपुरा होबळी भागातील गुज्जेगौदनापुरा येथे आढळणाऱ्या खास काळ्या रंगाच्या खडकात ही मूर्ती बसवण्यात आली आहे. या खडकासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

पीटीआयने रामललाची मूर्ती साकारलेल्या काळ्या रंगाच्या खडकाविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे. ज्या खडकापासून रामलला साकारले आहेत. तो सुमारे ३ अब्ज वर्षे जुना खडक आहे. हा खडक अतिशय गुळगुळीत असतो. म्हणूनच याला ‘सोप स्टोन’, असे म्हणतात. विविध शिल्पे बनवण्यासाठी सोप स्टोन आदर्श मानला जातो.

(हेही वाचा – Muslim : नया नगरमध्ये सोमवारी धर्मांध मुसलमानांचा उन्माद; मंगळवारी पालिकेने फिरवला ‘बुलडोझर’)

कंत्राटदाराने दिली माहिती…

रामदास नावाची व्यक्ती शेतजमिनीचे सपाटीकरण करताना ही शिला आढळून आली. यानंतर एका स्थानिक कंत्राटदाराने ही माहिती मंदिर विश्वस्तांना दिली. शिल्पकार अरुण योगीराज यांनी प्राणप्रतिष्ठेनंतर मीडियाला याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मला नेहमीच असे वाटते की, प्रभु राम माझे आणि माझ्या कुटुंबाचे सर्व वाईट काळापासून संरक्षण करत आहेत. त्यांनीच मला शुभकार्यासाठी निवडले, यावर माझा ठाम विश्वास आहे. मी या पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान व्यक्ती असून आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.