सध्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा विषय राजकीय पातळीवर वाढवला जात आहे. त्यावर प्रथमच मंगेशकर कुटुंबियांच्या माध्यमातून लता दीदींचे बंधू पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांनी यावर भाष्य केले. मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचे काहीही कारण नाही. कारण दीदीचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे, अशी आमची इच्छा नाही. राजकारणी लोकांनी दीदींच्या स्मारकावरील वाद कृपया बंद करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र सरकार संगीत विद्यालय स्थापन करते योग्य
दीदींच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगा ओतल्या तरी ती पोकळी भरून निघणार नाही. महाराष्ट्र शासनाने दीदीला लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. स्वतः लता मंगेशकरांनी त्यांना त्याबाबत विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ही मागणी अतिशय आनंदाने मान्य केली होती. त्याची सर्व पूर्वतयारी त्यांनी केली आहे. दीदीचे संगीत स्मारक होत आहे, यापेक्षा अन्य कुठलेही मोठे स्मारक होऊ शकत नाही, असेही ह्रदयनाथ मंगेशकर म्हणाले.
(हेही वाचा हिजाब तूर्तास घालू नका! उच्च न्यायालयाचा आदेश)
Join Our WhatsApp Community