बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान होणार असून, यासाठी मंडळाकडून तयारी करण्यात आली आहे. दरम्यान बोर्ड परीक्षा देण्यापूर्वी विभागीय शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा अनिवार्य केली असून, या माध्यमातून त्यांना अंतर्गत गुणदान केले जाणार आहे. तर 7 डिसेंबर ते 9 जानेवारी या वेळापत्रकानुसार, आठवड्यातून दोनवेळा सराव परीक्षा घेतली जात आहे. विशेष म्हणजे हा पॅटर्न औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळांच्या अंतर्गत पाचही जिल्ह्यांत राबवण्यासाठी बोर्डाने सर्व शिक्षणाधिका-यांना पत्राद्वारे कळवले आहे.
2019-20 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात आली नव्हती. त्यामुळे या वर्षातील विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्यातील या परीक्षेची भीती नाहीशी व्हावी, परीक्षेला सामोरे जाण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, लिखाणाचा सराव वाढावा, या हेतूने विभागीय शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा अनिवार्य केली आहे. या माध्यमातून त्यांना अंतर्गत गुण दिले जाणार आहेत.
( हेही वाचा: दहावी उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी; तब्बल ७९१४ जागांसाठी भरती, असा करा अर्ज )
प्रश्नसंच तयार
या सराव परीक्षेसाठी निवडक कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या गटाने कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसाठी प्रश्नसंचही तयार केले आहेत. यासाठी बोर्डाने वेळापत्रकही निश्चित केले असून शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली उपप्राचार्यांची एक समन्वय समितीही नियुक्त करण्यात आली आहे. तत्पूर्वी 24, 58 आणि 30 नोव्हेंबर रोजी घटक चाचणी घेण्यात आली. तर 7 डिसेंबर ते 19 जानेवारी या वेळापत्रकानुसार, आठवड्यातून दोनवेळा सराव परीक्षा घेतली जात आहे.