बुलढाण्यात गणिताचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच आता मुंबईतही बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याचे उघड झाले आहे. दादरमधील नामांकित काॅलजेमध्ये हा पेपर फुटीचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षांदरम्यान, राबवलेल्या काॅपी मुक्त अभियानाचा फज्जाच उडाल्याचे पाहायला मिळत आहे. बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या आहेत.
मुंबईच्या दादर येथील डाॅक्टर अॅंटोनियो डिसिल्वा हायस्कूल आणि ज्युनियर काॅलेजमध्ये गणिताचा पेपर फुटल्याचा प्रकार घडला आहे. विद्यार्थी परीक्षाकेंद्रात जाण्यासाठी 23 मिनिटे उरले असतानाच सकाळी 10:17 मिनिटांनी एका विद्यार्थ्याला व्हाॅट्सअॅपवर गणिताचा पेपर आला. पोलिसांनी या संदर्भात चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. तीन विद्यार्थ्यांसह एका शिक्षकावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रात परवानगी नसतानाही मोबाईल फोन घेऊन गेला. त्यांचा फोन तपासला असता त्यात गणिताचा पेपर आढळला.
( हेही वाचा: होळीपूर्वी केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा; ‘या’ डाळी होणार स्वस्त )
बुलढाण्यातही पेपर फुटला
बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजामध्ये बारावीचा गणिताचा पेपर परीक्षा सुरु होण्याआधीच अर्ध्या तास फुटल्याची चर्चा आहे. गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. पेपरफुटीच्या मुद्द्यावर विधानसभेतही चर्चा झाली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.