अकरावीची प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाइन- वर्षा गायकवाड

नलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये इतर भागातील विद्यार्थीही प्रवेश घेत असतात व काही विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सला जात असल्याने काही जागा रिक्त राहतात. पण या जागा रिक्त राहू नये ही शासनाची भूमिका आहे.

राज्यात सध्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. त्यामुळे यावर सभागृहात ही प्रक्रिया तूर्त तरी ऑनलाइन राहणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्यात इयत्ता अकरावीसाठीची प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाइन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. यापुढील काळातही कोरोनाची परिस्थिती पाहून पुढील वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन करावी किंवा कसे याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याबाबत विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

जागा रिक्त राहू नये ही शासनाची भूमिका

शासनाने गुणवत्ता व पारदर्शकतेच्या आधारावर ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली. कोरोनामुळे प्रवेश व शुल्क ऑनलाइन घेण्यात आले. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये इतर भागातील विद्यार्थीही प्रवेश घेत असतात व काही विद्यार्थी वेगवेगळ्या कोर्सला जात असल्याने काही जागा रिक्त राहतात. पण या जागा रिक्त राहू नये ही शासनाची भूमिका आहे. अशी माहिती शिक्षण मंत्री गायकवाड यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री विक्रम काळे, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here