बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 6 गुण; शिक्षण मंडळाचा निर्णय

hsc exam 2023 begin from 21 february
HSC Exam 2023: ऑल दी बेस्ट! मंगळवारपासून बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होणार

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. बारावी बोर्ड परीक्षेत इंग्रजी पेपरमध्ये बोर्डाकडून झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या, त्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना आता सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचे निदर्शनात आले होते. त्यानंतर याबाबतीत बोर्डाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

पेपरमधील चुका बोर्डाने केल्या मान्य

21 फेब्रुवारीला बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. या इंग्रजीच्या पेपरमध्ये कविता विभागातील प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. इंग्रजीच्या पेपरमधील तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या. या तीन प्रश्नांसाठी सहा गुण होते. आता बोर्डाने इंग्रजी पेपरमधील चुका मान्य करत विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बोर्डाकडून विद्यार्थ्यांना त्या तीन प्रश्नांसाठी एकूण सहा गुण देण्यात येणार आहेत.

( हेही वाचा: ठाणेकरांना मिळणार 289 कोटींचे नवे रेल्वे स्टेशन )

ते तीन प्रश्न ज्यांनी सोडवले त्यांना मिळणार गुण

बोर्डाकडून निर्णय देत सांगितले आहे की, बारावीच्या इंग्रजी पेपरमधील चुकलेले तीन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना सहा गुण देण्यात येतील. इंग्रजी पेपरमध्ये चुका आढळल्यानंतर त्याबाबतीत बोर्डाने अहवाल जारी करण्यास सांगितले होते. यामध्ये काही तज्ज्ञांची बैठक झाली. बोर्डाने दिलेल्या अहवालामध्ये इंग्रजी पेपरमध्ये चुका झाल्याचे बोर्डाने मान्य केले आहे. तीन प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here