HSC Exam 2023: ऑल दी बेस्ट! मंगळवारपासून बारावीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होणार

203

राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा उद्यापासून म्हणजेच २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. यंदा १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षा देणार असून ही आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तयारी पूर्ण झाली आहे.

शेवटी १० मिनिट वाढवून देण्यात येणार

राज्यातील ३१९५ मुख्य केंद्रावर ही परीक्षा पार पडेल. मुलींची ६,६४,४६१ इतकी संख्या तर मुलांची संख्या ७ लाखांवर आहे. यंदाच्या वर्षी कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर भरारी पथक आणि बैठी पथक असणार आहेत. विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटी १० मिनिट वाढवून देण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रावर ५० मीटर अंतरावर कुठल्याही व्यक्तीला विद्यार्थी व्यतिरिक्त कोणाला ही फिरायला परवानगी नाही. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रापासून ५० मीटर अंतरावरील झेरॉक्सचे दुकान बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रश्नपत्रिका पोचवणाऱ्या वाहनांवर जी पी एस लावण्यात येणार आहेत. उच्च शिक्षण विभाग शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा संप असला तरी सुद्धा १२विचा प्रॅक्टिकल झाले असून कुठलेही कॉलेज राहिले असतील तर थेरीनंतर प्रॅक्टिकल देता येणार आहेत.

(हेही वाचा – विद्यापीठांतील शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना बसणार फटका?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.