व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवून कॉपी; बारावी पेपर फुटी प्रकरणात दोन शिक्षकांसह ५ जणांना अटक

बारावी पेपर फुटीसाठी बुलढाण्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवून कॉपी केल्याचा प्रकार तपासादरम्यान उघडकीस आला असून याप्रकरणी दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय परीक्षेत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते १२ हजार रुपये घेतले जात असल्याची माहितीही तपासादरम्यान समोर आली आहे.

( हेही वाचा : आता फेसबुकवर झटपट बनवा ‘REELS’! मेटाकडून नव्या चार अपडेटची घोषणा )

बारावी पेपर फुटी प्रकरणी तपास सुरू असून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ९९ जणांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये पेपर लीके केल्याचे उघडकीस आले आहे. पेपर फुटीची घटना समोर आल्यावर हा ग्रुप डिलीट करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. सायबर सेलकडून डिलीट करण्यात आलेला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई कनेक्शन

बारावी पेपर फुटीचा संबंध मुंबईतील काही विद्यार्थ्यांशी सुद्धा आहे. मुंबईतील विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये गणिताच्या पेपरचा काही भाग आढळला आहे. डॉ. अँथोनी डिसिल्वा शाळेतील परिक्षार्थीच्या मोबाइलमध्येही गणिताच्या पेपरचा काही भाग सापडल्यामुळे ३ विद्यार्थ्यांसह अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास क्राईम ब्रांचकडे देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here